# औरंगाबादेत 34 रुग्णांची वाढ; जिल्ह्यात एकूण 687 कोरोनाबाधित, 4 जणांचा मृत्यू.

 

औरंगाबाद: औरंगाबाद शहरातील विविध भागातील 34 कोरोनाबाधितांची भर पडल्याने जिल्ह्यातील कोरोनाबधितांची संख्या 687 झाली आहे.  नव्याने भर पडलेल्यांमध्ये 20 पुरूष आणि 14 महिला रुग्णांचा समावेश आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयातून (मिनी घाटी) आज सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला. यामध्ये औरंगाबाद शहराच्या संजय नगरातील चार, किल्लेअर्क आणि नूर कॉलनीतील प्रत्येकी एक असे एकूण सहा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. यामध्ये चार महिला आणि दोन पुरूष आहेत. तर दोन घाटीतील रुग्णांनाही डिस्चार्ज मिळाल्याने एकूण आठ कोरोनाबाधित  रुग्ण आज कोरोनामुक्त झाल्याचे मिनी घाटी प्रशासनाने कळविले आहे.

आतापर्यंत 70 जण मिनी घाटीतून, घाटीतून तीन, मनपाच्या कोवीड केअर केंद्रातून 132, खासगी रुग्णालयातून पाच असे एकूण 210 जण बरे होऊन घरी गेले आहेत. मिनी घाटीत आज 42 स्वॅब घेतले असून ते घाटीच्या प्रयोगशाळेत पाठविले आहेत. गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातील 14 आणि अन्य दोन असे एकूण 16 अहवाल येणे बाकी आहेत.

नव्याने आढळलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या):  औरंगाबाद शहरातील राम नगर (01), संजय नगर (02), नवयुग कॉलनी, भावसिंग पुरा (01), आरटीओ ऑफिस जवळ, पद्मपुरा (01), भुजबळ नगर, नंदनवन कॉलनी (01), वृंदावन कॉलनी, नंदनवन कॉलनी (01), नंदनवन कॉलनी (01),  गगनबावडी, नंदनवन कॉलनी (02), पुंडलिक नगर, गल्ली क्रमांक दोन (02), गांधी नगर, गल्ली क्रमांक एक (01), जयभवानी नगर (05), विजय नगर, गारखेडा परिसर (01), सातारा परिसर (02),  एन आठ (01), रहेमानिया कॉलनी, गल्ली नं. चार (02), हुसेन कॉलनी, गारखेडा परिसर (03), घाटी परिसर (01), भडकल गेट (01), अरुणोदय कॉलनी (01),  सिल्क मिल कॉलनी (01), कैलास नगर (01), सिल्लेखाना (01), शहा बाजार (01) या परिसरातील आहेत.

खासगी रुग्णालयात कोरोनाबाधिताचा मृत्यू:  रहेमानिया कॉलनीतील 59 वर्षीय पुरूष कोरोनाबाधित रुग्णाचा एका खासगी रुग्णालयात आज मृत्यू झाला. तसेच घाटीत मागील 24 तासात तीन महिला रुग्णांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंत 19 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला असल्याचेही मिनी घाटी प्रशासनाने सांगितले.

घाटीत 56 रुग्णांवर उपचार सुरू:
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (घाटी) येथे आज दुपारी चार वाजेपर्यंत घाटीच्या डेडिकेटेड कोवीड रुग्णालयात 56 (कोरोना) पॉझिटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत. यापैकी 49 रुग्णांची स्थिती सामान्य आहे.  सात रुग्णांची स्थिती गंभीर आहे. तर दोन पॉझिटिव्ह रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे त्यांना आज सुटी देण्यात आली आहे. या रुग्णांमध्ये समता नगरातील 51 वर्षीय पुरूष आणि असेफिया कॉलनीतील 38 वर्षीय महिला रुग्णाचा समावेश आहे. तसेच 38 कोरोना निगेटिव्ह रुग्णांवर उपचार सुरु आहेत, असे घाटीच्या अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर आणि माध्यम समन्वयक डॉ. अरविंद गायकवाड यांनी सांगितले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *