पुणे: आर्ट ऑफ लिव्हींगचे श्री श्री रविशंकर यांच्या सूचनेनुसार पीआर हेड व लाईफ कोच कुमकुम नरेन आणि आयटी प्रोफेशनल व लाईफ कोच शशिधर रमेश केवळ पत्रकारांसाठी 16 ते 19 मे या कालावधीत सकाळी 8.30 ते 10.30 या वेळेत ऑनलाईन हॅप्पीनेस प्रोग्राम घेणार आहेत.
मागील दोन बॅचमध्ये मुंबई, पुण्यासह महाराष्ट्रातील अनेक ठिकाणचे पत्रकार यात घरबसल्या सहभागी झाले होते. प्राणायाम आणि सुदर्शनक्रिया घरी नियमितपणे कशी करावी याची माहिती प्रात्यक्षिकासह या कोर्सच्या माध्यमातून दिली जाते.
ज्यांना हा कोर्स करायचा आहे त्या पत्रकारांसाठी तिसरी बॅच 16 ते 19 मे 2020 या दरम्यान घेण्यात येणार आहे. कोरोना संसर्गाच्या प्रकोपामुळे, त्यानंतर येणाऱ्या बदलांना कसे सामोरे जावे, या विचारांमुळे सध्या पत्रकार तणावग्रस्त वातावरणात काम करत आहेत. त्या पार्श्वभूमीवर केवळ पत्रकारांसाठी या शिबिराचे झूम अॅपच्या माध्यमातून आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर विनामूल्य आहे.
मीडियातील ज्या पत्रकार बांधव व भगिनींना शिबिरात सहभागी व्हायचे आहे त्यांनी खालील स्वरूपात आपली माहिती या मोबाईलवर 8805008972 किंवा या 7020991708 व्हाट्सअॅप क्रमांकावर आज गुरुवार, 14 मे रोजी रात्री 8 वाजेपर्यंत पाठवावी.
1. संपूर्ण नाव:
2. प्रसारमाध्यमाचे नाव:
3. माध्यमात कार्यरत असलेल्या ठिकाणाचे नाव:
4.मोबाईल नंबर (व्हाट्स अॅपसह):
5. ईमेल आयडी: