औरंगाबाद: लॉकडाऊनमुळे सुमारे 2 महिन्यापासून डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात शिक्षण घेणारे बाहेर गावचे 50 विद्यार्थी विद्यापीठ परिसरात अडकले होते. विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन विद्यापीठातील जनसंपर्क अधिकारी संजय शिंदे, अमोल दांडगे, डॉ. नीलेश अंबेवाडीकर यांनी 8 ते 10 दिवस सलग महसूल विभाग, पोलीस प्रशासन, एस. टी. महामंडळ यांच्याकडे पाठपुरावा करून विद्यार्थ्यांना त्यांच्या गावी जालना, बीड, हिंगोली, वाशीम, नांदेड, बुलढाणा, अकोला आदी शहरात जाण्याची व्यवस्था केल्याने हे विद्यार्थी आज 2 बसद्वारे गावाकडे रवाना झाले.
या कठीण प्रसंगी सामाजिक बांधिलकी जपताना आपल्य सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या घरी पाठवण्यासाठी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद, कुलगुरू प्रमोद येवले, आमदार सतीश चव्हाण, आमदार अंबादास दानवे, बेगमपुरा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप, विशेष शाखेचे पोलीस निरीक्षक बारगळ, पोलीस उपनिरीक्षक गोरक चव्हाण, डॉ. आनंद सोमवंशी, लक्ष्मण हिवराळे, प्रा. बिना सेनगर, प्रा. अभिजित दिक्कत, मयूर सोनवणे, विकास ठाले या सर्वांनी मोलाचे सहकार्य केले.
मित्रानो आपण सुखरूप घरी जाऊन आपल्या आई वडिलांना भेटल्यावर जो आनंद होईल तो शब्दात वर्णन करता येणार नाही आणि तुमचा आनंद व घरी पोहचल्याचे समाधान ही आमच्या कार्याची पावती आहे, या शब्दात आपल्या भावना वरील मान्यवरांनी व्यक्त केल्या.