औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज गुरूवारी 62 कोरोनाबाधितांची वाढ झाली. यामध्ये 34 पुरूष आणि 28 महिलांचा समावेश असल्याने जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या 749 झाली आहे. तर घाटीमध्ये एका 55 वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितले आहे.
मिनी घाटीमध्ये आज 10 जणांचा स्वॅब घेण्यात आला, त्यांचे अहवाल येणे बाकी आहेत. परंतु कालच्या नमुन्यातील 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. सध्या मिनी घाटीत 85 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत.
औरंगाबाद जिल्ह्यातील आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे: (कंसात रुग्ण संख्या)
भीमनगर (15), पडेगाव (01), उस्मानपुरा (07), सिल्क मिल कॉलनी (01), कांचनवाडी (01), नारळीबाग (01), आरटीओ (02), गरम पाणी (01), बन्सीलाल नगर (01), सातारा (08), हुसेन कॉलनी (02), दत्त नगर (01), न्याय नगर (02), पुंडलिक नगर (01), संजय नगर – मुकुंदवाडी (03), गुरू नगर (01), नंदनवन कॉलनी (01), गारखेडा (01), शहानूरवाडी (01), बेगमपुरा (01), अन्य (01), आलोक नगर, सातारा परिसर (01), पुंडलिक नगर (01), संजय नगर (01), बजाज नगर (वाळूज) (01), किराडपुरा (01), बारी कॉलनी, रोशन गेट, गल्ली क्र. 12 (01), असेफिया कॉलनी (01), कटकट गेट (01), इंदिरा नगर, बायजीपुरा (01).