पुणे: पुणे विभागातील 2 हजार 75 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात आज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 हजार 271 झाली आहे. काल ही संख्या 4020 होती. यामध्ये आज दिवसभरात 251 रूग्णांची वाढ झाली आहे.
दरम्यान, ॲक्टीव रुग्ण 1 हजार 979 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 217 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 153 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्ह्यातील 3 हजार 720 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 1 हजार 880 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 649 आहे. कोरोनाबाधित एकूण 191 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 142 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
सातारा जिल्ह्यातील 126 कोरोनाबाधित रुग्ण असून 45 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 79 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 353 कोरोनाबाधित रुग्ण असून 112 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 219 आहे. कोरोनाबाधित एकूण 22 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील 43 कोरोनाबाधित रुग्ण असून 29 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 14 आहे. कोरोनाबाधित 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 28 कोरोनाबाधित रुग्ण असून 9 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 18 आहे. कोरोनाबाधित 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.