बीड: बीड जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण नसल्यामुळे जिल्हा ग्रीन झोनमध्ये होता. मात्र, शनिवारी रात्री दोन जणांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आले, असून हे दोघे माजलगाव व गेवराई तालुक्यातील असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अशोक थोरात यांनी दिली.
दरम्यान, गेवराई येथील रुग्ण पुण्याहून तर माजलगाव येथील रुग्ण मुंबईहून विना परवानगी बीड जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती हाती आली आहे.
बीड जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात आष्टी तालुक्यात एक रुग्ण आढळून आला होता. तो रुग्ण बरा झाल्यानंतर एकही रुग्ण आढळून आला नव्हता. आज शनिवारी प्राप्त झालेल्या अहवालामध्ये माजलगाव व गेवराई येथील प्रत्येकी एक असे दोन रुग्णांचे स्वॅब कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले. हे दोन्ही रुग्ण पुणे व मुंबई येथून आले होते, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
गेवराई येथील रुग्ण पुण्याहून तर माजलगाव येथील रुग्ण मुंबईहून विना परवानगी बीड जिल्ह्यात दाखल झाल्याची माहिती आहे. आता या दोघांच्याही संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करण्याची कारवाई आरोग्य विभागाकडून सुरु झाली आहे. यामुळे आता बीड जिल्ह्याला अधिक लक्ष देण्याची गरज आहे.