# खूश ख़बर: मान्सून दक्षिण अंदमानात दाखल.

 

पुणे: मान्सून अखेर आज रविवारी दक्षिण अंदमानात दाखल झाला. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या ‘अमफन’ चक्रीवादळामुळे नैऋत्य मोसमी वाऱ्यांना चालना मिळाल्याची माहिती हवामान खात्याने दिली. परिणामी झपाट्याने त्याने अंदमानच्या दक्षिण भागापर्यंत मजल मारली. पुढील ७२ तासात अंदमान, निकोबार बेटांच्या आणखी काही भागात मान्सूनचे आगमन होण्यास अनुकूल वातावरण तयार होत आहे.

सर्वसाधारणपणे मान्सून २० ते २२ मे दरम्यान अंदमानात दाखल होत असतो. यंदा मात्र चक्रीवादळामुळे तो ३-४ दिवस अगोदरच दाखल झाला आहे. दरम्यान, केरळमधील मान्सूनच्या आगमनावर महाराष्ट्रातील मान्सूनचे आगमन अवलंबून असते. परंतु केरळमध्ये तो ५ जूनच्या आसपास म्हणजे वेळापत्रकापेक्षा ५ ते ६ दिवस उशिराने दाखल होणार आहे. परिणामी पुण्या-मुंबईसह राज्यातही तो विलंबाने दाखल होण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *