# पिंपरी चिंचवडमधील दीड महिन्याचे बाळ झाले कोरोनामुक्त.

 

पिंपरी: आज पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातून कोरोनाबाधित दीड महिन्याच्या बाळाला आणि त्याच्या ४ वर्षाच्या मोठ्या भावास १४ दिवसांच्या उपचारानंतर सुखरूप घरी सोडण्यात आले. ते दोघेही कोरोना पाॅझिटिव्ह होते. ते संभाजीनगर चिंचवड येथील रहिवाशी होते.

मुंबईला डिलिव्हरीला गेलेली आई १महिन्यांनी पुण्याला परत आली व बाळाला ताप आल्यामुळे वाय.सी.एम. रुग्णालय येथे दाखल केले होते. तेथे तपासणी केली असता बाळ व मोठा भाऊ दोघेही पाॅझिटीव्ह आले. तसेच आजोबा सुद्धा पाॅझिटीव्ह आले होते, तर आईचा अहवाल निगेटिव्ह आला होता. यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयातील बालरोग विभागात त्यांच्यावर उपचार केले. त्यातून ते संपूर्ण बरे झाले आहेत. या दीड महिन्याच्या बाळासह त्याच्या चार वर्षांच्या भावाला पूर्ण बरे करण्यासाठी वैद्यकीय अधिष्ठाता डाॅ. राजेंद्र वाबळे व डाॅ अनिकेत लाठी यांच्या मार्गदर्शनाखाली बालरोग विभाग प्रमुख डॉ. दीपाली अंबिके, वैद्यकीय अधिकारी डाॅ. संध्या हरिभक्त, डॉ. सीमा सोनी, डॉ. सूर्यकांत मुंडलोड, डॉ. नुपूर कत्रे, डॉ. शीतल खाडे, डॉ. प्राजक्ता कदम, डॉ. गौरव शर्मा, डॉ. सबाहत अहमद, डॉ. अभिजीत ब्याले, डॉ. रिजवना सय्यद, डॉ. कोमल बिजारनिया व सर्व परिचारिका यांचे सहकार्य लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *