मुंबई: कोरोना वाढीचा गुणाकार रोखण्यात यशस्वी झालो आहोत. ग्रीन झोनमध्ये हळुवारपणे काही गोष्टी खुले करण्यास परवानगी दिली आहे. उद्योग धंद्याबाबत आपण तारेवरची कसरत करत आहोत. राज्यात पन्नास हजार उद्योग सुरू करण्यास परवाने दिले आहेत. पाच लाख मजूर कामावर रुजू झाले आहेत. सत्तर हजार उद्योगांना परवाने दिले आहेत. परंतु रेड झोनमध्ये निर्बध कायम ठेवले आहेत.
श्री. ठाकरे यांनी लाॅकडाऊन 4 च्या निमित्ताने आज राज्यातील जनतेशी संवाद साधला. ते म्हणाले की, आपल्या सरकारला सहा महिने पूर्ण होत आहेत. नवीन योजना जाहीर केल्या परंतु कोरोनामुळे त्या ठप्प झाल्या आहेत. असे असले तरी त्या योजना पूर्ण करणारच. नवीन उद्योग आणण्यासाठी कोण काय सुविधा देते याकडे लक्ष आहे. ४० हजार हेक्टर जमीन उद्योगांसाठी राखीव ठेवली आहे. नवीन उद्योग, ग्रीन उद्योग सुरू करताना कुठल्याही परवानगीशिवाय उद्योग सुरू करण्यास मान्यता देत आहोत. यापुढे नवीन उद्योजकांना अटीतटींचा सामना करावा लागणार नाही .नवीन उद्योजक येणार असतील तर त्यांना भाडेतत्वावर जमीन देणार. त्यांना मूलभूत सुविधा देणार. नवीन उद्योगपर्व सुरू करणार आहोत.
आपल्यासमोर दोन मोठी आव्हाने आहेत. ग्रीन झोन आपल्याला कोरोनामुक्त ठेवायचे आहे. नवीन रुग्ण वाढू द्यायचे नाही. रेड झोन लवकरात लवकर ग्रीन झोनमध्ये आणायचा आहे. ग्रीन झोनमध्ये जिथे जिथे परवानगी दिली आहे. त्या ठिकाणी कामगारांची गरज भासणार आहे. महाराष्ट्रातील भूमिपुत्रांना आव्हान करतो की, त्यांनी या संधीचा फायदा घ्या. जिथे जिथे ग्रीन झोन आहे, तुम्ही आत्मनिष्ठेने बाहेर पडून पुढे या. आत्मनिर्भर व्हा. महाराष्ट्र उभा करू. जगासमोर आदर्श उभे करू. भूमिपुत्रांनो पुढे या.
आरोग्य सुविधा
आयसीयू बेड्सची सुविधा आपण सुरू करत आहोत. ही आरोग्य सुविधा वाढवत नेत आहोत. महाराष्ट्रात १४२४ कोविड सेंटर्स आहेत. अडीच लाख बेडस् सज्ज ठेवले आहेत. रुग्णांची संख्या वाढल्याने बेड मिळत नाही. पुढच्या महिन्यात किती रुग्ण होतील, याची काळजी घेऊन उपाययोजना करत आहोत.
ज्यांची ज्यांची कोविड योद्धा म्हणून काम करण्याची इच्छा असेल त्यांनी पुढे यावे. महाराष्ट्रात सद्यस्थितीला रुग्णसंख्या अधिक असली तर अनेकजण बरे होत आहेत. १९ हजार ५०० रुग्ण आहेत. पाचशे घरी देखील गेले आहेत. वेळत उपचारासाठी आले तर ते बरे होवून घरी जावू शकतात.
रेड झोनमधील उद्योग सुरू झाले तर साथीचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणात वाढेल. सध्या हे संकट मंदावून ठेवत आहेत. हळूहळू आपण वेगवेगळे क्षेत्र सुरू करत आहोत.
सध्या पाच लाख ट्रेन आणि बसने त्यांना त्यांच्या राज्यात पाठवले आहे. मजुरांनी रस्तावरून चालू नये, तुमच्यासाठी सर्व सुविधा दिल्या आहेत. रस्त्यावर चालू नका. तुमच्यासाठी वाहनांची सुविधा सुरू झालेली आहे. प्रत्येक जिल्ह्यातील प्रशासन यासाठी काम करत आहे. त्यांच्याकडून तिकटे घेतली नाही. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून त्यांचा खर्च उचलला आहे. तळहातवर पोट असलेले हे मजूर आहेत. सरकारी खर्चाने त्यांना पाठवले आहेत.
आपल्या राज्यातील लोकांना आजपर्यंत सहकार्य केले आहे. यापुढेही सहकार्य कराल ही अपेक्षा. कोकण म्हटल्यावर सध्या आंब्याचा मोसम आहे. परंतु या वेळी गम्मत नाही. कृपा करून आपण रस्त्यावरून जावू नका. मुंबईत काळजी घेत आहोत. परंतु आरोग्य सुविधांची मर्यादा पाहिली तर ते तसेच ठेवयची आहेत.
घाई करू नका. अस्वस्थ होऊन गावी जाण्याची घाई करू नका. करोनासोबत जगायला शिका असे अनेकजण सांगत आहेत. घरात रहा, सुरक्षित रहा. घराबाहेर राहताना सुरक्षित रहा.
किती काळ हा विषाणू जीवंत राहील हे सांगता येत नाही. या गोष्टी घेऊन पुढे काही दिवस सावध राहावे लागणार नाही. इतके दिवस जी शिस्त पाळली आहे. ती यापुढे कायम ठेवा. धार्मिक सण, उत्सव यांना आपण परवानगी दिलेली नाही. दोन हात दूर राहून आपल्याला राहायचे आहे.
सरकारच्या सूचना या गतिरोधक आहेत. काहीकाही दुकाने सुरू करण्यास परवानगी दिली जाईल. कोणतीही गोष्टी सुरू करण्यापूर्वी जनतेला परवानगी दिलेली आहे. एखादी गोष्टी सुरू केल्यानंतर ते सुरूच राहिले पाहिजे.
काहींच्या परीक्षा राहिल्या आहेत, शाळा कशा सुरू करणार. ऑनलाइन करणार का नाही, हे मोठे विषय आहेत, शाळा सुरू कसे करायचे, याचा विचार सुरू आहे.
हे संकट आहे, ते पावसाळ्यापूर्वी संपवायचे आहे. जून महिन्यात शाळा, कॉलेज प्रवेश याचा विचार करता, त्याचा विचार करून कोरोना नियंत्रणात आणायचा आहे.
जोपर्यंत तुमचा –माझ्यात विश्वासाचा धागा आहे, तोपर्यंत हे संकट आपण परतून लावणार आहोत. आपल्याला जनजीवन पुन्हा रुळावर आणायचे आहे.
महाराष्ट्राला धोका होऊ नये, यासाठी हे कठोर पावलं उचलली जात आहेत. हे केवळ आपल्या हितासाठी आहे. यापुढे सरकारला सहकार्य करा. ही साखळी तोडून वजनमुक्त होऊ.