# पुणे विभागातील 2355 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी; विभागात कोरोनाबाधित 4996 रुग्ण.

 

पुणे: पुणे विभागातील 2 हजार 355 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 4 हजार 996 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 2 हजार 352 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 248 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 172 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 4 हजार 280 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 2 हजार 69 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 996 आहे. कोरोनाबाधित एकूण 215 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 165 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात 157, सोलापूर जिल्ह्यात 53, कोल्हापूर जिल्ह्यात 40, सातारा जिल्ह्यात 5, सांगली जिल्ह्यात 2 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील 138 कोरोनाबाधित रुग्ण असून 75 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 61 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 443 कोरोनाबाधित रुग्ण असून 165 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 209 आहे. कोरोनाबाधित एकूण 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील 52 कोरोनाबाधित रुग्ण असून 33 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 18 आहे. कोरोनाबाधित 1 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 83 कोरोनाबाधित रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 68 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *