# नांदेड विभागातील सहा रेल्वे स्थानकावर आरक्षण केंद्र सुरु; १ जूनपासून सचखंड धावणार.

 

नांदेड: नांदेड विभागातील सहा रेल्वे स्थानकावर शुक्रवार, २२ मे पासून आरक्षण केंद्र पुन्हा सुरु झाले आहे. दरम्यान, १ जूनपासून सचखंड विशेष एक्स्प्रेस रेल्वे धावणार असल्याची माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या वतीने देण्यात आली.

रेल्वे बोर्डाने कळविल्यानुसार आज पासून नांदेड विभागातील सहा रेल्वे स्थानकावर रेल्वे आरक्षण केंद्र पुन्हा प्रवाशांकरिता सुरु करण्यात आले आहे. यात नांदेड, पूर्णा, परभणी, सेलू, जालना आणि औरंगाबाद रेल्वे स्थानकांचा समावेश आहे. लॉकडाऊन आणि कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीमुळे आरक्षण कार्यालयाच्या वेळा पुढीलप्रमाणे असतील:
सकाळी- ८.०० ते १२.०० वाजेपर्यंत
दुपारी-  २.००  ते ५.०० वाजेपर्यंत

तसेच रेल्वे बोर्डाने दिनांक १ जूनपासून देशभर २०० विशेष गाड्या चालविण्याचे ठरविले आहे. यात नांदेड विभागातून नांदेड-अमृतसर-नांदेड दरम्यान सचखंड विशेष एक्स्प्रेस धावणार आहे.

ही गाडी दिनांक 1 जून रोजी नांदेड येथून गाडी संख्या ०२७१५ नांदेड- अमृतसर विशेष एक्स्प्रेस बनून धावेल. तसेच दिनांक ३ जूनपासून अमृतसर येथून ही गाडी संख्या ०२७१६ अमृतसर-नांदेड सचखंड विशेष एक्स्प्रेस बनून धावेल. या गाडीस २२ डब्बे असतील, यात वातानूकुलीत तसेच बगैर वातानूकुलीत डब्बे असतील. सामान्य म्हणजेच जनरलचे डब्बे नसतील. या विशेष गाडीच्या वेळा नियमित नांदेड-अमृतसर-नांदेड सचखंड एस्क्प्रेससारख्याच असतील.

महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या कोविड-१९ चे दिशा निर्देशानुसार महाराष्ट्रातील दोन जिल्ह्याअंतर्गत येणाऱ्या रेल्वे स्थानकांदरम्यान प्रवाशांना या विशेष गाड्यांमध्ये प्रवास करता येणार नाही.

यापूर्वीच ठरविल्यानुसार श्रमिक विशेष गाड्यांचे नियोजन संबंधित राज्य सरकार करेल. प्रवाशांना विनंती आहे की, त्यांनी रेल्वे आरक्षण केंद्रावर / रेल्वे स्थानकावर येतांना तसेच रेल्वेगाडीत प्रवास करतांना भारत सरकारने तसेच संबंधित राज्य सरकारने कोरोनाचा प्रसार रोखण्या करिता दिलेल्या दिशा निर्देशांचे पूर्ण पालन करावे. तसेच ते ज्या राज्यात प्रवासाने पोहोचतील त्या संबंधितराज्याच्या कोरोना (कोविड-१९) चा प्रसार रोखण्या करिता दिलेल्या दिशानिर्देशांचे पूर्ण पालन करावे.

विशेष गाड्यांमध्ये प्रवेश करण्यापूर्वी प्रवाशांची शारीरिक तपासणी करण्यात येणार नाही. ज्या प्रवाशांना कोरोना (कोविड-19) चे कोणतेही लक्षण नसेल त्यांनाच या रेल्वे गाड्यांत प्रवेश दिला जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *