पुणे: राज्यातील विदर्भ आणि मराठवाड्यात सध्या उष्णतेची लाट सुरू आहे. ही लाट पुढील चार ते पाच दिवस कायम राहणार आहे. दरम्यान, मध्य महाराष्ट्रातील बहुतांश शहरांचा कमाल तापमानाचा पारा चाळीस अंशाच्या पुढे गेला आहे. शनिवारी राज्यात नागपूर शहराचे तापमान सर्वाधिक 46.5 अंश सेल्सिअस असे नोंदले गेले.
उत्तर भारतातील राजस्थान, हरियाणा, पंजाब, छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तरप्रदेश, यासह दक्षिणेकडीला आंध्रप्रदेशची किनारपट्टी, तेलंगणा या राज्यात उष्णतेची तीव्र लाट आली आहे . उत्तरेकडून राज्याकडे उष्ण वारे वाहत असल्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातही उष्णतेची लाट आली आहे. या भागातील बहुतांश शहरांचा कमाल तापमानाचा पारा 46. अंश सेल्सिअसच्या आसपास पोहचला आहे.
राज्यात शनिवारी नोंदलेले प्रमुख शहरांचे कमाल तापमान: अंश सेल्सिअसमध्ये- पुणे-39.8, लोहगाव-41, जळगाव-45, कोल्हापूर-36.7, महाबळेश्वर- 32.1, मालेगाव-44.4, नाशिक- 38.9, सांगली- 39.2, सातारा- 40.1, सोलापूर-44.2, मुंबई-34.7, अलिबाग-32.7, डहाणू-34.7, औरंगाबाद-42.2, परभणी-45.4, नांदेड-44, अकोला-46, अमरवती-45.6, बुलढाणा-43, ब्रम्हपुरी-44,1, चंद्रपूर-45,6, गोंदिया-45,4, नागपूर-46,5, वाशिम-42.6, वर्धा-45.5.