पुणे: पुणे विभागातील 3 हजार 159 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 6 हजार 487 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 3 हजार15 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 312 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ज्यामध्ये पुण्यातील 264 जणांचा समावेश आहे. तसेच 195 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील 5 हजार 436 बाधित रुग्ण असून, आज पुण्यातील 7 जणांसह विभागात 14 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनाबाधित 2 हजार 770 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 2 हजार 334 आहे. तसेच 187 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत.
कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये पुणे जिल्ह्यात 353, सातारा जिल्ह्यात 40, सोलापूर जिल्ह्यात 24, सांगली जिल्ह्यात 8, कोल्हापूर जिल्ह्यात 33 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्ह्यातील 241 कोरोनाबाधित रुग्ण असून 114 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 121 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 548 कोरोनाबाधित रुग्ण असून 224 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 284 आहे. कोरोनाबाधित एकूण 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील 70 कोरोनाबाधित रुग्ण असून 38 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 31 आहे. कोरोनाबाधित 1 रुग्णाचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 228 कोरोना बाधित रुग्ण असून 13 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 213 आहे. कोरोनाबाधित एकूण 2 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.