# कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश, सव्वा लाखऐवजी ३३ हजार रुग्ण -मुख्यमंत्री उद्धव ठाकरे.

 

मुंबई: मे महिन्याच्या शेवटच्या टप्प्यात सव्वा ते दीड लाख केसेस होण्याचा केंद्राचा अंदाज होता. प्रत्यक्षात आपल्याकडे आज ३३ हजार ६८६ पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. ४७ हजारात पहिला रुग्ण धरला जातो. पहिला रुग्ण देखील यात पकडला आहे. १३ हजार रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ३३ हजार रुग्ण आपल्याकडे आहेत. सव्वालाखांची शक्यता होती. हे आपल्यामुळे शक्य झाले आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज सांगितले.

महाराष्ट्रातील जनतेशी त्यांनी आज रविवारी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधला. ते पुढे म्हणाले काहींना या परिस्थितीचे अद्याप गांभीर्य लक्षात येत नाही. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात आहोत. मार्च-एप्रिलमध्ये हे संकट आपल्याकडे आले. हा विषाणू गुणाकार करतो. याला मर्यादा नाही. लॉकडाऊनमुळे याचा प्रादुर्भाव रोखण्यात आपण यशस्वी होत आहोत. प्रादुर्भाव रोखण्याचे काम करा. एकूण जे वातावरण आहे. हे कुणालाच आवडणारे नाही. गेल्या अधिवेशनात आपण पॅकेजची घोषणा केली. हे स्वप्न पूर्ण करताना अडचणी येत आहेत.

मुंबईमध्ये ज्या कोरोना पॉझिटिव्ह महिलांची या काळात प्रसूती झाली आहेत. त्यांची बालके कोरोनामुक्त जन्माला आलेली आहेत. हा निसर्गाचा चमत्कार झाला आहे. एक ९० वर्षांच्या आजी बऱ्या होऊन घरी गेल्या आहेत.

यापुढची लढाई अधिक बिकट होणार आहे. आपल्याकडे काही केसेस वाढणार आहेत. पण घाबरण्याचे कारण नाही. आपण मोठ्या प्रमाणावर आरोग्य सुविधा उपलब्ध करत आहोत. रुग्णशय्येची व्यवस्था करत आहोत. बांद्रा कुर्ला, वरळी डोम, गोरेगाव येथील रुग्णालये सज्ज ठेवली आहेत. काही ठिकाणी आयसीयूची सोय केली आहे.

रुग्णांची आबाळ होऊ नये. परंतु ते होत आहे. याचं कारण हे संकट मोठं आहे. एप्रिल-मे मध्ये रुग्णालयात २५ हजाराच्या आसपास बेड होते. मे अखेरीस १४ हजार बेडस् उपलब्ध असतील. तीन टप्प्यात त्या असतील. काहीजणांना व्हेंटिलेटरपेक्षा ऑक्सिजनची गरज असते. राज्यभर आपण जे बेडसची सुविधा देत आहोत. त्या ठिकाणी ऑक्सिजन पुरवले जात आहे. हे केवळ महाराष्ट्रात केले जात आहे. हा टप्पा ओलांडत असताना रक्ताचा पुरवठा मुबलक प्रमाणत उपलब्ध नाही. आपल्याकडे दहा दिवस पुरेल एवढं रक्त उपलब्ध आहे. आता पुन्हा रक्तदानाची गरज आहे. महाराष्ट्राच्या रक्तात संकटाविरुद्ध लढण्याची जिद्द कशी असते हे दाखवून द्यायचे आहे. ज्यांची रक्तदान करण्याची इच्छा आहे. त्यांनी पुढे यावे.

पुढे पावसाळा मोसम आहे. पावसामुळे काही साथी येण्याची शक्यता आहे. पावसाळ्यात पुन्हा एकदा खबरदारी घ्यायची आहे. स्वच्छ पाणी, उकळून पिणे इतर आजारापासून लांब राहणे म्हणजे कोरोनापासून लांब राहणे आहे.

प्रत्यक्ष कोरोनाने किती मृत्यू झाला आहे. यात मधुमेह, कीडनी इतर आजार असलेल्या रुग्णांवर कोरोना घातक हल्ला करतोय. जरा लक्षण दिसले तरी डॉक्टरांकडे जायला हवे. सर्दी खोकला सोबत थकवा, चव जाणे ताप येणे आदी लक्षणे कोरोनाची आहेत. आजार अंगावर काढू नका. लगेच डॉक्टरांशी संपर्क साधा. प्रारंभी डॉक्टरांकडे आल्यास उपचार करणे शक्य होईल. आपल्याकडे दीड हजार लोकांचे मत्यू झाले आहे. अनेक रुग्ण वेळेत न आल्याने झाले आहे.

या विषाणूवर औषध नसले तर आपले डॉक्टर प्रयत्नाची पराकाष्टा करत आहेत. त्यांना आपण धन्यवाद द्यायला हवेत. त्यांनी काही औषधं काढली आहेत. प्राथमिक अवस्थेत कोणती औषधं दिल्यानंतर काय परिणाम होतात. यावर अभ्यास केला जात आहे. त्यांना चांगले यश मिळत आहे. डॉक्टर तर काम करतात,, औषधे मिळाले पाहिजेत. रुग्ण देखील वेळेत डॉक्टरांकडे आले पाहिजेत.

आपण महापालिकेच्यावतीने घरोघरी जावून लक्षण असलेल्या रुग्णावर उपचार करत आहोत. हा विषाणू कोणापर्यंत पोहोचण्यापूर्वी त्याला रोखण्याची गरज आहे.

ग्रामीण भागांनी खूप जिद्दीने काम केले आहे. विदर्भ आणि मराठवाड्यातील परिस्थिती नियंत्रणात आली आहे. मालेगाव, औरंगाबाद येथील परिस्थिती आटोक्यात येत आहे.

काही जण म्हणतात की तुम्ही पॅकेज का देत नाही. आम्ही सर्व देणार आहोत. यापूर्वी खूप पॅकेज वाटले. त्याने काय झाले. पोकळ घोषणा करणारे आपले सरकार नाही. आज गोरगरीबांना धान्य देण्याची योजना केंद्राने मान्य केले. त्यांचे धन्यवाद. शिवभोजन योजना लाखांच्यावरती लाभ मिळतो. पहिल्यांदा अन्न मिळणे, उपचार मिळणे महत्वाचे आहे. सर्वांसाठी या उपाययोजना करत आहोत. पॅकेजची जाहिरात करायची की घोषणा करायची.

महात्मा ज्योतिबा योजनेत १०० टक्के मोफत उपचार केले जाणार आहेत. साडेपाच लाख मजुरांची खाण्याची सोय केली. त्यांना घरी जाण्यासाठी खर्च केला. आता हे संकट वाढल्यानंतर त्यांना घरी जाण्यासाठी परवानगी दिली आहे.

४८१ ट्रेन्स राज्याने सोडलेल्या आहेत. प्रवासी मजुरांची संख्या सहा ते सात लाख इतकी आहे. राज्यसरकारने ८५ कोटी रुपये दिले आहेत.

आपण रोज ८० रेल्वेची मागणी करतो आहोत. आम्ही सोय करायला तयार आहेत. परंतु निम्म्या रेल्वे मिळत आहेत. ते कामगार महाराष्ट्र सरकारचे आभार मानत आहेत.

एसटीने मोठी भूमिका निभावली आहे. दिशाहीन भटकंती चालली होती. त्यांना दिलासा देण्यासाठी एसटी महामंडळाने काम केले आहे. त्यांना जेथे जायचे त्यांची सोय केली. काहींना एसटीतून परराज्यात पाठवले आहे. पाच मे ते २३ मे पर्यंत ३२ हजार फेऱ्या झाल्या आहेत. ३ लाख ८० मजुरांना त्यांच्या राज्यापर्यंत पोहोचले आहे. यावर ७५ कोटी खर्च केले आहे.

अजून कुठले पॅकेज पाहिजे. बाहेर देशातून येणाऱ्यांची सोय करतात. नेमके किती जण येणार, त्याचे परिणाम काय राहतील, याची माहिती घेऊ द्या.

आगामी काळात शिक्षण, शेतीबाबत निर्णय घेतला जाईल. अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेतली जाईल. महाराष्ट्र शासन तुमच्या पाठिशी आहे. तुम्ही काळजी करू नका.

महाराष्ट्राचे अर्थचक्राबाबत काय करणार. पन्नास हजार उद्योग सुरू आहेत. सहा लाख कामगार आले आहे. रोजगार हमी योजना सुरू झाली आहे. भिवंडी-मालेगाव येथे टेक्सटाइल्स सुरू करण्यास परवानगी दिली आहे. चित्रिकरण, नाट्यगृह, चित्रपटसृष्टी सुरू करण्याची परवानगी दिली जाईल. डबींग एडिटींगवर विचार करतो आहोत.

आपल्या राज्यातील लोकांना मी प्रेमाने आणि हक्काने सांगू शकतो. तुमची मागणी लवकर मार्गी लावू. आत्ताचा हा काळ कठिण आहे.

मी काल सोनिया आणि इतर नेत्यांशी बोललो. पुढील पंधरा दिवसांत आपल्या देशाचे खरे चित्र समोर येणार आहे. विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्याचा खरा आकडा समजेल.

काही भागातील दुकाने, कार्यालये सुरू करतो आहोत. खरीप, पीककर्ज विम्याची चर्चा केली. शेतकऱ्यांना बांधावरतीच बी-बियाणे कशी उपलब्ध करून देता येतील याचा विचार केला आहे. शेती चालू राहीलीच पाहिजे. शेतकऱ्याची खबरदारी घेत आहोत. धान, मका, कापूस खरेदी सुरू आहे. दूध, मका इतर अन्नधान्याबाबत विचार करून निर्णय घेतला जात आहे. सर्व शेतकऱ्यांना आधार देत आहोत. कुणालाही वाऱ्यावर सोडत नाहीत.

शिक्षण, आरोग्य, शेतीसह आरोग्य खात्यावर आपण काम करत आहोत. काही ठिकाणी आरोग्य सेवा वाढवण्यावर भर देत आहोत. चाचणी वाढवतो आहोत. विदर्भ, कोकणात चाचणी केंद्र सुरू केले जाईल.

एकूणच काय हा संकटाचा काळ आहे. कोणी राजकारण करू नये. तुम्ही केलं म्हणून आम्ही नाही करणार. आमच्यावर महाराष्ट्राचा विश्वास आहे. तुम्ही काही बोला. महाराष्ट्र सरकार प्रामाणिक काम करत आहे.

माणुसकी मोठा धर्म आहे. घरातून उत्सव साजरा करा. सर्व मदत करताना राजकारण करणे महाराष्ट्राच्या संस्कृतीला शोभत नाही. या संकटात राजकारण करणे योग्य नाही. माझ्या संस्कृतीत हे बसत नाही.

३१ तारखेला लॉकडाऊन उठणार की नाही, हे सांगता येत नाही. कोरोनाचा व्हायरस जोरदार वाढत आहे. काही दिवसांत कोरोना वाढणार आहे.

लॉकडाऊन अचानक लावणे योग्य नाही, तसे ते उठवणे शक्य नाही. हळूहळू आपली गाडी पूर्वपदावर आणतो आहोत. हे करताना सावध पावलं टाकावी लागवी लागतील. काळजी घ्यावी घ्यावी लागेल.

कोरोनाने जगायचे शिकवले आहे. कोरोनाचे संकट आपण नक्की घालवणार. हे संकट इष्टापत्ती समजून काळजी घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *