# विदर्भ, मध्यमहाराष्ट्र, मराठवाड्यात शुक्रवारपर्यंत उष्णतेची तीव्र लाट.

 

पुणे:  राज्यात आता येते दोन दिवस म्हणजे शुक्रवारपर्यंत विदर्भ, मध्यमहाराष्ट्र, आणि मराठवाड्यात उष्णतेच्या तीव्र लाटेचा इशारा पुणे वेधशाळेने दिला आहे. 30 मे नंतर मात्र सोसाट्याचा वार्‍यासह विजांचा कडकडाट सुरू होईल.

राज्यात आता उष्णतेची लाट शेवटच्या टप्प्यात असून पुढचे दोन दिवस तापमानाचा पारा आणखी वरचढ राहणार आहे. 28 व 29 मे पर्यंत अतितीव्र उकाडा सहन करावा लागेल. 30 मे पासून मात्र सोसाट्याचा वारा, विजांच्या कडकडाटासह काही भागात अवकाळी पाऊस पडणार आहे. ही सुरवात कोकणात होईल. त्यानंतर राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण निर्माण होऊन तापमान कमी होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *