औरंगाबाद: सततच्या दुष्काळामुळे मराठवाड्याचे कधीही भरून निघणार नाही एवढे मोठे नुकसान झाले आहे. दरम्यान, कोरोना लाॅकडाऊनमुळे मराठवाडा पाणी परिषदेतर्फे पहिल्या फेसबुक लाईव्ह पाणी परिषदेचे शनिवार, 30 मे रोजी सकाळी अकरा ते दुपारी चार या वेळात ग्रामविकास भवन सिडको येथून आयोजन करण्यात आले आहे.
ही परिषद दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी एकात्मिक जलनीती या मुख्य संकल्पनेवर आधारित आहे. पाणी परिषदेचे उद्घघाटन माजी मंत्री पंकजाताई मुंडे करणार असून, समारोपप्रसंगी आमदार अंबादास दानवे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या परिषदेत मराठवाड्याचा पाणीप्रश्न उपाय, दुष्काळमुक्त मराठवाड्यासाठी आंतरखोरे पाणी परिवहन, पाण्याचा कार्यक्षम व उत्पादक वापर या विषयावर डाॅ. रमेश पांडव, संचालक गोपीनाथराव मुंडे राष्ट्रीय ग्रामीण विकास व संशोधन संस्था, शंकराव नागरे, डॉ. भगवानराव कापसे हे मार्गदर्शन करणार आहेत सर्व जल प्रेमी नागरिकांनी Https://www.facebook.com/GramvikasSanstha1/ या फेसबुक कींवा Gramvikas SANSTHA Aurangabad या युट्युबवरुन पाणी परिषदेत सहभागी व्हावे, असे आवाहन मराठवाडा पाणी परिषदेचे अध्यक्ष नरहरी शिवपुरे, उपाध्यक्ष मनोहर सरोदे, सतीश नवनाथ पवार, जिल्हाध्यक्ष कल्पना निकम यांनी केली आहे.