# मुंबईतील ५४ जणांसह आज राज्यात ९९ कोरोनाबाधितांचा मृत्यू.

 

मुंबई:  राज्यात आज १०८४ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, आतापर्यंत राज्यभरात २८ हजार ८१ रुग्णांना घरी सोडण्यात आले आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या २९४० नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ३४ हजार ८८१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ४ लाख ३३ हजार ५५७ नमुन्यांपैकी ६५ हजार १६८ जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४३ शासकीय आणि ३४ खाजगी अशा ७७ प्रयोगशाळा निदानासाठी कार्यरत असून राज्यातील प्रयोगशाळा चाचण्यांचे प्रमाण प्रति दशलक्ष ३३४९ एवढे आहे. देशपातळीवर हे प्रमाण २५२३ एवढे आहे. सध्या राज्यात ५ लाख ५१ हजार ६६० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात संस्थात्मक क्वारंटाईन सुविधांमध्ये ७२ हजार ६८१ खाटा उपलब्ध असून सध्या ३५ हजार ४२० लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्याचा रुग्ण दुपटीचा वेग मागील आठवड्यात ११.३ दिवस होता तो आता १७.५ दिवस झाला आहे. देशाचा रुग्ण दुपटीचा वेग १७.१ दिवस आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ४३.०७ टक्के एवढे आहे. राज्यातील मृत्यू दर ३.३७ टक्के आहे.  राज्यात ९९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद आज झाली आहे. आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी आरोग्य मंडळ निहाय मृत्यू असे: ठाणे- ८१ (मुंबई ५४, ठाणे ६, वसई-विरार ७, नवी मुंबई २, रायगड ३, पनवेल ७, कल्याण डोंबिवली २), नाशिक- ३ (जळगाव ३), पुणे- १२ (पुणे ६, सोलापूर ६), नागपूर-१, इतर राज्ये-२ राजस्थान येथील एक मृत्यू पनवेलमध्ये तर बिहारमधील एका व्यक्तीचा मृत्यू मुंबईमध्ये झाला आहे.

आज नोंद झालेल्या मृत्यूंपैकी ६२ पुरुष तर ३७ महिला आहेत. आज नोंद झालेल्या ९९ मृत्यूपैकी ६० वर्षे किंवा त्यावरील ४८ रुग्ण आहेत तर ४९ रुग्ण हे ४० ते ५९ या वयोगटातील आहेत. तर २ जण ४० वर्षांखालील आहे. या ९९ रुग्णांपैकी ६६ जणांमध्ये (६७ टक्के) मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयरोग, अशा स्वरुपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यूंची संख्या आता २१९७ झाली आहे.

आज नोंद झालेल्या एकूण मृत्यूपैकी ४० मृत्यू हे मागील दोन दिवसांतील आहेत तर उर्वरित मृत्यू हे ६ मे ते २७ मे या कालावधीतील आहेत. या कालावधीतील ५९ मृत्यूंपैकी मुंबई ३५, पनवेल -७, ठाणे -६, वसई विरार – ६, नवी मुंबई -२, कल्याण डोंबिवली -१ जळगाव- १ तर १ मृत्यू इतर राज्यातील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *