औरंगाबाद: राज्य शासनाच्या निर्देशानुसार जिल्ह्यातील लॉकडाऊनचा कालावधी 30 जून 2020 च्या मध्यरात्रीपर्यंत वाढवण्यात आलेला आहे. त्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद जिल्हादंडाधिकारी उदय चौधरी यांनी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 व फौजदारी दंड प्रकिया संहिता 1973 चे कलम 144 (1) (3) मधील तरतुदीनुसार औरंगाबाद जिल्ह्यासाठी (पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे कार्यक्षेत्र वगळून) हे मनाई आदेश जारी केले आहेत. हे आदेश यापुढे 30 जून 2020 च्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत लागू राहतील. तसेच पोलीस आयुक्तालय क्षेत्राबाबत पोलीस आयुक्त (शहर) औरंगाबाद यांचे आदेश अंमलात राहतील.
शासनाच्या मिशन बिगीन अगेन अंतर्गतच्या आदेशानुसार 1 जूनपासून पुढील नियमावली व उपाययोजना लागू करण्यात येत आहेत. याअंतर्गत कोविड 19 च्या व्यवस्थापनाबाबत केंद्र शासनाचे निर्देश औरंगाबाद जिल्ह्यासाठी पुढीलप्रमाणे लागू राहतील.
रात्रीची संचारबंदी: अत्यावश्यक बाबी वगळता रात्री 9.00 ते पहाटे 5.00 वाजेपर्यंत नागरिकांची हालचाल/आवागमन पूर्णपणे प्रतिबंधीत करण्यात येत आहे.
कमजोर व्यक्तींना/गटांना संसर्गापासून संरक्षण: 65 वर्षावरील ज्येष्ठ नागरीक, यापूर्वी इतर आजार असलेल्या व्यक्ती, गरोदर महिला, 10 वर्षाच्या खालील बालके, वैद्यकीय बाबी व अत्यावश्यआक बाबी वगळता राष्ट्रीय निर्देकांनुसार घरी राहतील यांची दक्षता घ्यावी.
कन्टेनमेंट झोन:
i. सार्वजनिक आरोग्य कुटुंब कल्याण मंत्रालयाने निश्चित केलेल्या मागदर्शक तत्वांनुसार महानगरपालिका / जिल्हा प्रशासनाकडून कन्टेन्मेंट झोन निर्धारीत करण्यात येईल.
ii. औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात आयुक्त, महानगरपालिका, औरंगाबाद तर जिल्ह्याच्या उर्वरित भागात जिल्हाधिकारी, औरंगाबाद हे कन्टेन्मेंट झोनची निश्चिती करतील. कन्टेन्मेंट झोन हे रहिवासी कॉलनी, मोहल्ला, झोपडपटटी, इमारत, इमारतीचा समूह, गल्ली्, महानगरपालिका वार्ड, पोलीस स्टेशनची हद्द, खेडेगाव, गावाचा समूह, ग्रामपंचायत यांच्या आधारे निश्चित करण्यात येईल.
iii. कन्टेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्यक सेवा चालू राहतील. कन्टेन्मेंट झोनमध्ये नागरीकांची ये-जा रोखण्यासाठी काटेकोर परिघीय नियंत्रण ठेवण्यात यावे. कन्टेन्मेंट झोनमध्ये केवळ वैद्यकीय, आपत्कालीन सेवा आणि जिवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यासाठीच नागरीकांचे आवागमन चालू राहील. याबाबतीत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाचे मार्गदर्शक तत्वाचे पालन करणे बंधनकारक आहे.
निर्बंध शिथील करणे व टप्याटप्याने लॉकडाऊन उघडणे:
औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रात कन्टेन्मेंट क्षेत्र वगळता खालील बाबींना निर्बधासह चालू करण्यास परवानगी राहील. ज्या बाबींना यापूर्वी परवानगी देण्यात आली आहे. शासन अधिसूचनेनुसार साथरोग अधिनियम खंड 2 (1) नुसार कोविड-19 वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्याससाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यासाठी महानगरपालिका आयुक्त यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. तसेच मुख्य सचिव यांचे पत्रानुसार आयुक्त महानगरपालिका औरंगाबाद यांना औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये बाजार/दुकाने यांचे नियंत्रण करण्यासाठी प्राधिकृत करण्यात आलेले आहे. त्यानुसार औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्रामध्ये लॉकडाऊनबाबत आयुक्त, महानगरपालिका औरंगाबाद यांचे आदेश लागू राहतील.
औरंगाबाद महानगरपालिका क्षेत्र वगळून विवक्षीतपणे प्रतिबंध नसलेल्या सर्व गोष्टींना खालील अटी व शर्तीवर परवानगी राहील.
a. अनुज्ञेय असलेल्या कुठल्याही बाबीसाठी कोणत्याही शासकीय अधिका-यांची परवानगीची आवश्यक असणार नाही.
b. क्रीडा संकुले व क्रीडागृहे तसेच सार्वजनिक वापरातील खुल्या जागावर वैयक्तीक व्यायाम करण्यासाठी परवानगी राहील. तथापी प्रेक्षक आणि समूह गतीविधींना परवानगी असणार नाही. सर्व प्रकारचे शारीरिक व्यायाम आणि इतर सर्व गोष्टी योग्य सामाजिक अंतर ठेवून करणे आवश्यक आहे.
सर्व शासकीय व खाजगी वाहतुकीसाठी खालीलप्रमाणे प्रवासी अनुज्ञेय असतील.
i. दुचाकी – केवळ चालक
ii. तीनचाकी- चालक व इतर 2 प्रवासी
iii. चारचाकी- चालक व इतर 2 प्रवासी
d. सामाजिक अंतर व निर्जंतुकीकरणाच्या उपायांचा अवलंब करुन जिल्ह्याअंतर्गत बस वाहतूक जास्तीत जास्त 50 टक्के क्षमतेने करता येईल.
e. आंतर जिल्हार बस वाहतूक बंद राहील.
f. सर्व बाजार / दुकाने सकाळी 9.00 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत सुरु राहतील. तथापी गर्दी उसळल्यास व सामाजिक अंतराच्या तत्वाचे पालन होत नाही असे दिसून आल्यास स्थानिक प्राधिकरणाने संबंधित बाजार/दुकाने तत्काळ बंद करावीत.
मनाई आदेशादरम्यान 30 जूनपर्यंत प्रतिबंधीत असलेल्या बाबी खालीलप्रमाणे आहेत:
i. सर्व शाळा, महाविद्यालये, सर्व प्रकारच्या शैक्षणिक संस्था, प्रशिक्षण केंद्रे, शिकवणी वर्ग/संस्था बंद राहतील. तथापी ऑनलाईन /दुरस्थ शिक्षणाला परवानगी राहील.
ii. सर्व राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रवासी हवाई वाहतूक – वैद्यकीय सेवा, एअर अॅम्बु्लन्स, सुरक्षा विषयक बाबी आणि गृहमंत्रालयाने परवानगी दिलेल्या बाबी वगळून बंद राहील.
iii. रेल्वे प्रवासी वाहतूक व खाजगी विमान सेवा बंद राहतील तथापी स्व तंत्र आदेशाव्दारे परवानगी दिलेल्या बाबी वगळून.
iv. सर्व सिनेमागृहे, व्यायाम शाळा, जलतरण तलाव, मनोरंजन केंद्रे, प्रेक्षागृहे, बार, सभागृहे, मंगल कार्यालये आणि एकत्रित जमण्याची ठिकाणे आणि तत्सम इतर ठिकाणे.
v. सर्व सामाजिक/राजकीय/ क्रीडा विषयक/ मनोरंजन /शैक्षणिक / सांस्कृतीक /धार्मिक कार्यक्रम / इतर संमेलने.
vi. सर्व धार्मिक स्थळे तसेच इतर सर्व प्रार्थना स्थळे भाविकांना दर्शनासाठी बंद राहतील. सर्व धार्मिक सभा/परिषदा बंद राहतील.
vii. शॉपिंग मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट आणि इतर सर्व आदरातिथ्य सेवा बंद राहतील. मात्र, आरोग्य/पोलीस/शासकीय अधिकारी/आरोग्य विषयक कर्मचारी, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या व्यक्ती जसे की, पर्यटक आणि अलगीकरणासाठी आवश्यक असणारी आदरातिथ्य सेवा चालू राहतील. तसेच बस डेपो, रेल्वेस्टेशन आणि विमानतळावरील उपाहारगृहे चालू राहतील. घरपोच सेवा देण्याासाठी उपाहारागृहाना त्यांचे किचन चालू ठेवता येईल.
ठराविक व्यक्ती व वस्तूच्या आवागमनास सुनिश्चित करण्यायबाबतचे विशेष निर्देश:
i. सर्व वैद्यकीय क्षेत्राशी निगडीत व्यक्ती जसे की, डॉक्टर्स, नर्सेस, सर्व पॅरामेडीकल कर्मचारी, स्वच्छ्ता कर्मचारी, अॅम्बूलन्स यांना कोणत्याही निर्बंधाशिवाय आंतरराज्यीय आणि आंतर-जिल्हा आवागमनास परवानगी राहील.
ii. निर्गमित केलेल्या आदर्श मार्गदर्शक तत्वानुसार आंतर राज्य व आंतर जिल्ह्यामध्ये अडकलेल्या कामगार, प्रवासी कामगार, यात्रेकरू, पर्यटक इत्यादींच्या हालचाली नियंत्रित असतील.
iii. निर्गमित केलेल्या आदर्श मार्गदर्शक तत्वानुसार श्रमिक विशेष गाड्या चालू राहतील.
iv. सर्व रिकाम्या ट्रकसह सर्व प्रकारच्या वस्तू /मालवाहतुकीची आंतरराज्यीय हालचाल करण्यास परवानगी राहील.
आरोग्य सेतू अॅपचा वापर:
i. आरोग्य सेतू अॅप हे संसर्गाची संभाव्य धोक्याची सुरवातीच्या काळात माहिती देते त्यामुळे ते व्यक्तींसाठी व समाजासाठी सुरक्षा कवचाप्रमाणे काम करते.
ii. कार्यालये व कामाच्या ठिकाणांची सुरक्षीतता विचारात घेता जास्तीत जास्त कर्मचारी आरोग्य सेतू अॅप अनुरुप मोबाईल फोनमध्ये Install करतील याची खात्री करावी.
iii. जिल्हा प्रशासन नागरिकांना आरोग्यक सेतू अॅपचा वापर करावा आणि त्यांच्या आरोग्याची अद्ययावत माहिती सदरील अॅपवर अपलोड करावी, असे आवाहन करीत आहे. जेणे करून जोखमीच्या वेळी संबंधिताना तत्काळ वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देता येईल.
स्थानिक पातळीवर नागरीकांनी स्वतः हून काही आस्थापना/दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असला तरी अत्यावश्यक गोष्टींची दुकाने, औषधालये व कृषी सेवा संबंधित दुकाने कोणत्याही परिस्थितीत चालू राहतील.
परिशिष्ट-१
मिशन बिगीन अगेन
कोविड-19 च्या व्यवस्थापनासाठी राष्ट्रीय मार्गदर्शक तत्वे
सार्वजनिक ठिकाणे:
1. सर्व सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी व प्रवास करतांना फेस मास्क वापरणे बंधनकारक आहे.
2. सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीमधील अंतर किमान 6 फूट (दो गज की दुरी) ठेवावे. दुकानामध्येच ग्राहकाची संख्या एकावेळी 5 पेक्षा जास्त असणार नाही. याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधित दुकानदार/आस्थापना चालक यांचेवर राहील.
3. मोठ्या प्रमाणावर गर्दी होणारी ठिकाणे जसे की, संमेलने/परिषदा इ. प्रतिबंधीत असतील.
विवाहासारख्या सार्वजनिक कार्यक्रमात सामाजिक अंतर ठेवून 50 पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी नसेल तसेच अंत्यविधीसाठी 20 पेक्षा अधिक
व्यक्तींना परवानगी असणार नाही.
4. सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी थुंकणे दंडनीय राहील व त्या साठी संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेच्या कायद्यानुसार दंड आकारण्यात यावा.
5. सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा, मद्य, धुम्रपान यांचे सेवन करण्याास मनाई राहील.
6. पान, तंबाखूची दुकाने, रेस्टॉरंट पूर्णपणे बंद राहतील.
कामाच्या ठिकाणाबाबत अतिरिक्त सूचना:
7. जेथे शक्य असेल तेथे जास्तीत जास्ते घरी राहून काम (Work from Home) चा अवलंब करावा.
8. सार्वजनिक आरोग्यय व कुटुंब कल्याण विभागाकडून निर्गमित सूचनानुसार सर्व प्रवेश व निर्गम स्थाानावर थर्मल स्कॅनिंग, सॅनिटाइजर व हात धुण्याची सुविधा उपलब्ध करावी. कामाच्यार ठिकाणी पुरेशा प्रमाणात सॅनिटायजर, हॅन्ड वॉश उपलब्ध करुन देण्यात यावे.
9. सर्व कामाच्या ठिकाणाचे, सार्वजनिक सुविधांचे आणि मानवी संपर्कात येणारी सर्व ठिकाणी जसे की, दरवाजाचे हॅन्डल आदींचे दोन पाळ्यादरम्यान तसेच वांरवार निर्जंतुकीकरण करावे.
10. दोन पाळ्यामध्ये सुयोग्य अंतर ठेवून तसेच भोजन अवकाश योग्य वेळेचा ठेवून व इतर मार्गाचा वापर करून कामाच्या ठिकाणी योग्य सामाजिक अंतर पाळले जाईल यांची दक्षता घ्यावी.
परिशिष्ट-2
i. सर्व अत्यावश्यक सेवा पुरविणा-या दुकानांना यापूर्वीच्या आदेशाप्रमाणे चालू राहण्यास परवानगी असेल.
ii. सर्व अत्यावश्ययक सेवा पुरवित नसलेल्या दुकानांना यापूर्वीच्या आदेशाप्रमाणे दिलेली सूट व मार्गदर्शक तत्वांच्या आधारावर चालू राहण्यास परवानगी राहील. तसेच अशी दुकाने संबंधित महानगरपालिकांनी घेतलेल्या निर्णयानुसार कार्यरत राहतील.
iii. सर्व अत्यावश्यक वस्तू/साहित्य व अत्यावश्यक नसलेल्या वस्तू/साहित्य यांच्या ई-कॉमर्स सेवा चालू राहतील.
iv. सध्या चालू असलेली सर्व औद्योगिक केंद्रे कार्यरत राहतील.
v. सर्व बांधकामाशी निगडित क्षेत्रातील (सार्वजनिक/खाजगी) कामे सुरु राहतील. तसेच सर्व मान्सूनपूर्व कामे (सावर्जनिक/खाजगी) सुरु राहतील.
vi. घरपोच सेवा देण्यासाठी उपाहारागृहाना त्यांचे किचन चालू ठेवता येईल.
vii. ऑनलाईन /दुरस्थ शिक्षणाला परवानगी राहील.
viii. सर्व शासकीय कार्यालये 5 टक्के किंवा 10 व्यक्ती (जे जास्त असेल ते) या तत्वावर चालू राहतील.
ix. नागरीकांच्या हालचालीसाठी खालील प्रमाणे प्रवासी अनुज्ञेय असतील.
i. दुचाकी – केवळ चालक
ii. चारचाकी- चालक व इतर 2 प्रवासी
x. एखाद्या विशेष किंवा सर्वसाधारण आदेशानुसार इतर कोणत्याही बाबींसाठी परवानगी राहील.
दंडात्मक तरतूदी: उपरोक्त आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्ती, संस्था अथवा समूह यांचेविरुध्द आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 चे कलम 51 ते 60 तसेच भा.दं.वि. 1860 चे कलम 188 नुसार कायदेशीर कार्यवाही करण्यात येईल.
वरील आदेशाची अंमलबजावणी करीत असतांना सद्हेतुने केलेल्या कृत्यासाठी कुठल्याही अधिकारी व कर्मचारी यांचेविरुध्द कुठल्याही प्रकारची कायदेशिर कारवाई अथवा खटला दाखल करता येणार नाही.