पुणे: निसर्ग चक्रीवादळ शमताच मान्सूनने तमिळनाडूतून गती घेतली होती. ४ जूनला कर्नाटकपर्यंत आला. मात्र, ५ जूनला त्याने पुढे गती घेतली नाही. तो सध्या कर्नाटक भागातच स्थिर असल्याचा अंदाज हवामान विभागाने शुक्रवारी व्यक्त केला आहे.
अरबी समुद्रातून निघालेले निसर्ग चक्रीवादळ ४ जून रोजी मध्यप्रदेशात जाऊन पूर्णपणे शमले. तोवर तामिळनाडूत थांबलेल्या मान्सूनने गती घेऊन पुढे निघाले होते. मात्र, ५ जून रोजी ते आहे त्याच भागात स्थिर झाले आहे. शुक्रवारी ५ जून रोजी मान्सून मध्य अरबी समुद्र, संपूर्ण केरळ, कर्नाटकचा काही भाग, कोमोरीन, नैऋत्य बंगाल, दक्षिणपूर्व बंगालचा उपसागर व मध्यपूर्व बंगालच्या उपसागरात स्थिर आहे.