पुणे: पुणे विभागातील 7 हजार 566 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 12 हजार 418 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 4 हजार 275 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 577 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 245 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.93 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्ह्यातील 9 हजार 651 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 6 हजार 53 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 3 हजार 178 आहे. कोरोनाबाधित एकूण 420 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 234 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.72 टक्के आहे.
कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 204 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 128, सातारा जिल्ह्यात 10, सोलापूर जिल्ह्यात 32, सांगली जिल्ह्यात 19 तर कोल्हापूर जिल्ह्यात 15 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्ह्यातील 631 कोरोनाबाधित रुग्ण असून 331 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 272 आहे. कोरोनाबाधित एकूण 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 1295 कोरोना बाधित रुग्ण असून 666 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 514 आहे. कोरोनाबाधित एकूण 115 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील 161 कोरोनाबाधित रुग्ण असून 90 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 65 आहे. कोरोनाबाधित एकूण 6 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 680 कोरोनाबाधित रुग्ण असून 426 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 246 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आजपर्यंत विभागामध्ये एकूण 1 लाख 1 हजार 633 नमूने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते, त्यापैकी 98 हजार 257 नमुन्यांचा अहवाल प्राप्त झाला आहे. तर 3 हजार 376 नमुन्यांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. प्राप्त अहवालांपैकी 85 हजार 658 नमुन्यांचा अहवाल निगेटिव्ह असून 12 हजार 418 चा अहवाल पॉझिटिव्ह आहे.