पुणे: कर्नाटकातील कारवार येथे गेले ७-८ दिवस थबकलेला मान्सून गुरुवारी पुढे सरकला. त्याने महाराष्ट्र राज्यात एन्ट्री केली असून, तळ कोकणातील रत्नागिरी, हर्णे, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सोलापूरपर्यंत मजल मारल्याचे पुणे वेधशाळेने सांगितले.
पुढील २-३ दिवसात तो पुणे, मुंबईत दाखल होईल, असा अंदाज आहे. तर १३ ते १६ जूनदरम्यान कोकण, मुंबईत मुसळधार पाऊस पडेल, अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. मान्सूनने गुरुवारी गोवा, सिंधुदुर्गचा काही भाग, बेळगाव, सांगली, कोल्हापूर हा भाग देखील व्यापला आहे.