# औरंगाबाद वाळूज एमआयडीसीतील नामांकित कंपनीतही कोरोनाचा शिरकाव.

 

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज सकाळी 137 कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्याने एकूण कोरोनाबाधितांची संख्या 3497 झाली आहे. यापैकी 1857 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 187 जणांचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने आता 1453 रुग्णांवर उपचार सुरू आहे.

दरम्यान, औरंगाबादमध्ये रोज 100 पेक्षा अधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढत आहेत, ही चिंतेची बाब आहे. आता कोरोनाने इंडस्ट्रीमध्ये देखील शिरकाव केलेला आहे. वाळूज एमआयडीसीतील नामांकित कंपनीमध्ये गेल्यात पाच-सहा दिवसात 20 कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. तर याच भागातील अन्य एका कंपनीत आणखी 20 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. वाळूज पंढरपूर भागात दीडशेपेक्षा अधिक रुग्ण आढळले आहेत. या कंपनीने जे रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यांच्या आजूबाजूला काम करणाऱ्या 100 कर्मचाऱ्यांना होम क्वॉरंटाईन होण्याच्या सूचना दिल्या आहेत.

जिल्ह्यात आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे: (कंसात रुग्ण संख्या) वाळूज पंढरपूर (1), क्रांती नगर (1), मिल कॉर्नर (1), बनेवाडी (1), एन नऊ, सिडको (2), शिवाजी नगर (4), न्यू विशाल नगर (2), न्यू हनुमान नगर (1), उस्मानपुरा (7), राजीव नगर (3), अबरार कॉलनी (1), सातारा परिसर (3), जयसिंगपुरा (6), सुरेवाडी (2), एन बारा हडको (1), बायजीपुरा (1), मयूर नगर, एन अकरा (1), अहिनेस नगर (1), जय भवानी नगर (3), मातोश्री नगर (1), न्यू बायजीपुरा (1), एन बारा, हडको (1), गजानन नगर (5), गरिष नगर (1) , नारळीबाग (1), भावसिंगपुरा (1), कोकणवाडी (1), राम नगर (5), लक्ष्मी नगर (1), समर्थ नगर (1), राज नगर, छत्रपती नगर (1), सुभाषचंद्र बोस नगर (1), राजेसंभाजी कॉलनी, हर्सूल (1), न्यू गजानन कॉलनी (2), जाधववाडी, सिद्धेश्वर नगर (1), सावित्री नगर, चिकलठाणा (1), गादिया विहार, शंभू नगर (1), एसटी कॉलनी, एन दोन (1), एन अकरा, नवनाथ नगर (3), एन अकरा दीप नगर (4), जाधववाडी, राजे संभाजी कॉलनी (3), हनुमान चौक, चिकलठाणा (2), चिकलठाणा, पुष्पक गार्डन (1), हेडगेवार रुग्णालय परिसर (1), विष्णू नगर (1), एन बारा, स्वामी विवेकानंद नगर (1), उल्कानगरी (1), नागेश्वरवाडी (1), सुदर्शन् नगर, हडको (1), एन पाच सिडको (1), कैसर कॉलनी (1), एन दोन, ठाकरे नगर (1), एन दोन सिडको (1), गारखेडा परिसर (1), जय भवानी चौक, बजाज नगर (2), टाऊन सेंटर, महादेव मंदिराजवळ (1), एमजीएम हॉस्पिटलजवळ (1), सिद्धीविनायक मंदिराजवळ, बजाज नगर (5), दीपज्योती हाऊसिंग सोसायटी (1), तोरणा हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (3), सप्तशृंगी हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (2), जागृत हनुमान मंदिराजवळ, बजाज नगर (2), छत्रपती नगर, वडगाव (3), राम मंदिराजवळ, बजाज नगर (1), चैतन्य हाऊसिंग सोसायटी, बजाज नगर (1), पळशी (10), करमाड (1), पिसादेवी (2), कन्नड (6), गंगापूर (2) या भागातील कोरोना बाधित आहेत. यामध्ये 44 स्त्री व 93 पुरुष आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *