नायगांव (जि.नांदेड): बिलोली तालुक्यातील केरुर येथील तरुणी आणि किनाळा येथील तरुणाचे एकमेकांवर प्रेम होते. मात्र, तरुणीचा विवाह चोडी (ता.धर्माबाद) येथील तरूणासोबत 29 मे रोजी करण्यात आल्यानंतर या प्रेमीयुगुलाने पलायन करून देगलूर तालुक्यातील वझरगा येथील मन्याड नदीपात्रात दोघांही एकमेकांना ओडनीने बांधून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार, २३जून रोजी दुपारी उघडकीस आली. या घटनेची रामतीर्थ पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
बिलोली तालुक्यातील केरुर येथील भाग्यश्री पिराजी चिमनापुरे (वय१९) या तरुणीचे आजोळ किनाळा असून ती शिक्षणासाठी शंकरनगर येथील श्री साईबाबा विद्यालयात असल्याने ती अधून मधून आजोळी येत असे. दरम्यान, तेथील प्रविण त्र्यंबक कौठकर (वय२१) या तरुणासोबत प्रेम जडल्याने मागील काही दिवसांपासून एकमेकावर प्रेम असताना हे प्रकरण कुणालाही माहित नसल्याने मुलीच्या आई वडिलांनी आपल्या मुलीचा विवाह चोडी येथील तरूणासोबत 29 मे रोजी करून दिला. परंतु या प्रेमीयुगुलाच्या मनाविरूध्द हा विवाह असल्याने ही मुलगी सासर येथून माहेरी म्हणून आली असता ती 22मे च्या मध्यरात्री घरातील सर्व मंडळी गाढ झोपेत असताना ती घराबाहेर निघून प्रियकरासोबत पलायन केले. आपल्या प्रियकरापासून आपण दूर होत असल्याचे दुःख तिच्या व त्याच्या मनात होते. त्यामुळे त्यांनी 23 जून रोजी ही युवती आणि किनाळा येथील तिचा प्रियकर यांनी पहाटे देगलूर रोडवरील वझरगाव येथील मन्याड नदीच्या पात्रात उडी घेऊन आत्महत्या केली.
दरम्यान, नदीपात्राच्या कडेला सदरील मुलीचा फोटो, मुलाचे आधार कार्ड, दोघांच्या पायातील वहाने आणि मुलीची ओडणी नदीच्या कडेला ठेवून दोघेही एकमेकांच्या कंबरेला ओडणीने गच्च बांधून शेवटची घटका एकमेकांच्या मिठीत घालत दोघांनीही नदीच्या मधोमध असलेल्या पाण्यात जाऊन या जगाचा निरोप घेतला.
या घटनेची माहिती मिळताच रामतीर्थ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन घडलेल्या घटनेचा रितसर पंचनामा करून दोघांचेही मृतदेह पाण्याबाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी नायगाव येथील शासकीय रुग्णालयात पाठवले. या घटनेमुळे शंकरनगर परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मुलीचे वडील मरीबा चिमनापुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन रामतीर्थ पोलिस ठाण्यात रात्री उशिरा आकस्मात मूत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Good