मुंबई: राज्यात आज कोरोनाच्या ५०२४ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात ६५ हजार ८२९ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज २३६२ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून एकूण संख्या ७९ हजार ८१५ झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.२५ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ८ लाख ७१ हजार ८७५ नमुन्यांपैकी १ लाख ५२ हजार ७६५ नमुने पॉझिटिव्ह (१७.५२ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ५८ हजार ४८८ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३६ हजार ९०३ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यात आज १७५ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. यापैकी ९१ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित ८४ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.६५ टक्के एवढा आहे. मागील ४८ तासात झालेले ९१ मृत्यू हे मुंबई मनपा-४४, कल्याण-डोंबिवली मनपा-२, नाशिक-१. नाशिक मनपा-७, पुणे मनपा-१४, कोल्हापूर-१, औरंगाबाद मनपा-१४, लातूर-२, नांदेड मनपा-२, अकोला-१, अकोला मनपा-१, नागपूर मनपा-१, गोंदिया-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.