नवी दिल्ली: आजपर्यंत जगभरात कोरोनामुळे 5 लाखांवर मृत्यू झाले आहेत. भारतातही हा आकडा दिवसेंदिवस वाढत चालला असून साडेसोळा हजारांवर मृत्यू झाले आहेत. कोरोना मृत्यूच्या आकडेवारीत जगातील 10 देशात भारत आठव्या क्रमांकावर आहे.
एकट्या अमेरिकेत सर्वाधिक 1 लाख 28 हजार 437 मृत्यू झाले आहेत. त्याखालोखाल ब्राझीलमध्ये 57 हजार 658 जणांचा मृत्यू झाला आहे. तिसऱ्या क्रमांकावर इंग्लंड असून तेथे 43 हजार 550 जणांचा मृत्यू झाला असून चौथ्या क्रमांकावर इटली असून तेथे 34 हजार 738 जणांना प्राण गमवावे लागले. 5) फ्रान्स 29हजार 728. 6) स्पेन 28हजार 343. 7) मेक्सिको 26हजार 648. भारत आठव्या क्रमांकावर असून 16हजार 504 जणांचा मृत्यू झाला आहे. 9) इराण 10हजार 508 10) बेल्जियम 9हजार 729 व त्यानंतर जर्मनीचा क्रमांक असून तेथे 9 हजार 29 जणांचा मृत्यू झाला आहे. सविस्तर माहितीसाठी खालील लिंक वर क्लिक करा.