# राज्यात आज ५२५७ नवीन रुग्णांची नोंद; १८१ कोरोनाबाधितांचा मृत्यू.

मुंबई:  राज्यात आज कोरोनाच्या ५२५७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून, सध्या राज्यात ७३ हजार २९८ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत. आज २३८५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून, एकूण संख्या ८८ हजार ९६० झाली आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ५२.३७ टक्के एवढे झाले आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या ९ लाख ४३ हजार ४८५ नमुन्यांपैकी १ लाख ६९ हजार ८८३ नमुने पॉझिटिव्ह (१८ टक्के) आले आहेत. राज्यात ५ लाख ७४ हजार ९३ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ३७ हजार ७५८ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात आज १८१ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद. यापैकी ७८ मृत्यू मागील ४८ तासांमधील तर उर्वरित १०३ मृत्यू मागील कालावधीतील आहेत. सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४८ टक्के एवढा आहे.

मागील ४८ तासात झालेले ७८ मृत्यू हे मुंबई मनपा-२१, ठाणे-२, ठाणे मनपा-२, नवी मुंबई मनपा -१, भिवंडी निजामपूर मनपा-१, मीरा भाईंदर मनपा -४, मालेगाव मनपा-१, जळगाव-१, जळगाव मनपा-२, पुणे-१, पुणे मनपा-२०, पिंपरी चिंचवड मनपा -२, सोलापूर-२, सोलापूर मनपा-६, औरंगाबाद-३, औरंगाबाद मनपा-६, उस्मानाबाद-१, अमरावती मनपा-१, नागपूर मनपा-१ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *