बा विठ्ठला कोरोनाच्या संकटांतून सर्वाना सुखरूप ठेव..
पंढरीची वारी आहे माझे घरी । आणिक न करी तीर्थ व्रत । व्रत एकादशी करीन उपवाशी । गायीन अहर्निशी मुखी नाम ॥
या अभंगाच्या ओळी सार्थ करतं वारकरी पंढरीमध्ये दाखल होत असतात आज भक्तीच्या आनंदात आणी टाळ मृदंगाच्या गजरात वाळवंट दुमदुमन निघालं असत. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून प्रत्येक वारकरीला घरीच विठोबाची पूजा करावी लागणार आहे, तसं पहिलं तर या भक्तीमार्गाची ही परंपरांना पिढ्यान् पिढ्या जोपासलेली आहे. वारकरी संप्रदाय आणी विचारधारा संत मंडळीचे तत्वज्ञान महाराष्ट्राच्या आध्यात्मिक परंपरेचे वैभव आणि जगताच्या कल्याणाचा विचार देणारा सांप्रदाय महान आहे. हे दाखवून देते या वारीत सर्व जाती धर्म, पंत याना एकत्रित करून विठलाच्या प्रेमळ भक्तीचे व जीवनाचे आदर्श तत्वद्यान देणारी पंढरीची वारी जगातील एकमेवाद्वितीय वारी आहे. आजच्या आधुनिक युगात कोरोनाच्या परिस्थितीमध्ये मानसिक स्वास्थ्य बिघडत चालले असताना आध्यात्मिक विचारच मनाला शांती आणि समाधान देवू शकतात यासाठी व सामाजिक एकता टिकून रहावी म्हणून वारकरी संप्रदायाने नेहमी सकारात्मक भूमिका घेतली आहे. संताचे तत्वज्ञान हे वैश्विक कल्याण या संकल्पनेला सत्यात आणण्यासाठी नेहमी प्रयत्नशील असतात. तोच हा वारकऱ्यांचा सर्वात मोठा उत्सव पंढरीची वारी. यात आषाढी, कार्तिकी या प्रमुख एकादशी संपूर्ण भारत देशातून विठ्ठलाचे भक्त या सोहळ्यात सहभागी होतात. संत मंडळी तर या सोहळ्याची वाट पाहत असते.
आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाचा येती । पुंडलीक ज्ञान दिवटा शोभेवाळवंटी ॥
या सोहळ्यासाठी सर्व वारकरी प्रत्येक वर्षी हजार होतात. कारण त्यांना वर्षभर संसाराशी दोन हात करण्याची प्रेरणा शक्ती आणि बळ मिळत असल्याने वारकरी वर्षभर काबाड़ कष्ट करतात पण या दोन वाऱ्या कधीही विसरत नाहीत. पंढरीची वारी हा संशोधनाचा विषय आहे हजारो वर्षापूर्वीची परंपरा सातशे वर्षापासूनही अखंड अविरत आजतागायत सुरू आहे संत नामदेव संत ज्ञानदेव, संत सावता, संत चोखा, संत गोरा कुंभार. संत तुकाराम, संत जनाई, मुक्ताई, संत मीराबाई, यासारखे सर्व जाती धर्माचे संत या वारीसाठी एकत्रित होतात. याचं पंढरीच्या वाळवंटात जागर करत. भक्तीबरोबरच सामाजिक ऐक्याची महत्वाची भूमिका पार पडतात. वैचारिक देवान घेवाण होते. सर्व जातीधर्माच्या भिंती तोडून एकत्र भोजन, एकत्र कीर्तन करताना. कोणातच भेदभाव राहत नसे. कारण संत सर्वाना हाक देतात की
यारे यारे लहान थोर । याति भलति नारी नर ।
सकळासी येथे आहे अधिकार ।
या मुळे जाती पाती निर्मूलनासाठीचा पहिला प्रयत्न वारकरी संतानी केला. त्यांचा हा विचार भारताला सार्वभौम राखण्यात महत्वाची भूमिका पार पडत आहे. मानवी मूल्यांचा उत्सव हा पंढरीची वारी आहे. प्रत्येकजण यात घरातून सहभागी झाला आहे. भक्तीचा आनंद सोहळा संपूर्ण महाराष्ट्र लुटत आहे. या पंढरीच्या वारीमध्ये आपणही घरी विधायक उपक्रम जसे की वृक्ष लागवड, गरिबांना मदत करून सहभागी होवू विठलाच्या प्रेमळ भक्तीचा आनंद घेवू. पंढरीचा देव हा भविकासाठी उभा आहे भक्ताची वाट पाहत आहे.
संत सांगतात वाट पाहे उभा भेटीची आवड़ी। कृपाळू तातडी उताविळ॥
असा परमात्मा दयाळू आहे. कोणत्या जातीचा असो वा धर्माचा याचा कधीही विचार करत नाही. म्हणून ही पंढरीची वारी सामाजिक ऐक्यासाठी महत्वपूर्ण आहे. सध्याच्या प्रदूषित समाज व्यवस्थेला दिशा देण्याचं काम ही वारी करत आहे. इथे एकत्रितपणे आनंद लुटणारे वाद भेद आणी क्लेश याला विसरून सहभागी होता. म्हणून वारकरी विचार हा जगाला आदर्श आहे. वारीमधून आज प्रबोधनाचे पर्व सुरु आहे. यात अखिल भारतीय वारकरी मंडळ प्रामुख्यानं सहभागी झालेआहे. आम्ही हरित वारी निर्मळ वारी यासाठी वारकऱ्यांच्या हस्ते वृक्ष लागवड कार्यक्रम हाती घेतला आहे. यावर्षी प्रत्येक वारकऱ्याने पाच तरी वृक्ष लावायचे असा संकल्प केला आहे,
या निमिताने संत विचारांच्या परंपरेचे पाईक होतानां मनस्वी आनंद होतो. आम्ही ज्ञानोबा तुकोबाचे वारस म्हनून समाजिक जबाबदारीचे भान ठेवून वारकरी विचारांची दिवाळी म्हणजेच आषाढी वारी सोहळा साजरा करतं आहोत. पांडुरंगा चरणी मागणी मागू आमच्या पुरोगामी महाराष्ट्राला कोणाची नजर लागू नये. कोरोनाच्या संकटांतून सर्वाना सुखरूप ठेव, पाऊस चांगला पडू दे शेवटी संत नामदेवांच्या शब्दात
अहंकाराचा वारा न लागो राजसा । माझ्या विष्णू दासा भावीकाशी ॥
या वारीमध्ये विठ्ठल भक्तीचा आनंद आपण सर्वजण घरात सुरक्षित राहून लुटू महाराष्ट्रातील तमाम वारकरी बांधवांस आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा..!
-हभप हरिदास (भाऊ) जोगदंड
(लेखक अखिल भारतीय वारकरी मंडळ बीडचे जिल्हाध्यक्ष व बंकट स्वामी संस्थान पंढरपूरचे विश्वस्त आहेत)
मोबाईल: 9923168181