पुणे: पुणे विभागातील 17 हजार 54 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 28 हजार 248 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 10 हजार 93 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 1101 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 551 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 60.37 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.90 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्ह्यातील 23 हजार 321 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 13 हजार 731 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 8 हजार 824 आहे. कोरोनाबाधित एकूण 766 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 425 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 58.88 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.28 टक्के इतके आहे.
कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 1 हजार 274 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1186, सातारा जिल्ह्यात 19, सोलापूर जिल्ह्यात 35, सांगली जिल्ह्यात 23 तर कोल्हापूर जिल्ह्यात 11 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 1050 रुग्ण असून 740 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 265 आहे. कोरोनाबाधित एकूण 45 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 2 हजार 644 कोरोनाबाधित रुग्ण असून 1 हजार 624 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 753 आहे. कोरोनाबाधित एकूण 267 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 383 रुग्ण असून 239 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 132 आहे. कोरोनाबाधित एकूण 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 850 कोरोनाबाधित रुग्ण असून 720 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 119 आहे. कोरोनाबाधित एकूण 11 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.