पुणे: गुजरातपासून ते उत्तर केरळच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या पट्ट्याचा प्रभाव कोकणातील काही ठिकाणी दिसून येत आहे. परिणामी पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, पुणे, कोल्हापूर, सातारा (घाटमाथा) येथे मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
कमी दाबाचा पट्टा सौराष्ट्र गुजरातसह आंध्रप्रदेश ते केरळपर्यंत आहे. या पट्ट्याचा प्रभाव कायम आहे. याबरोबरच चक्रीय स्थिती आंध्रप्रदेशाच्या किनारपट्टीवर आहे. त्यामुळे कोकणात काही ठिकाणी मुसळधार तर मध्यमहाराष्ट्र आणि विदर्भात काही भागात मध्यम तर उर्वरित भागात रिमझिम पाऊस पडेल. दरम्यान, मराठवाड्यात पावसाने उघडीप दिली आहे.
गेल्या चोवीस तासात पडलेला पाऊस (मिमी मध्ये): माथेरान -90, जव्हार-80, बेलापूर-कर्जत-तलासरी- 70, मध्यमहाराष्ट्र-120, इगतपुरी -110, वेल्हे -90, गगनबावडा-80, राधानगरी-80, गोंदिया, गोरेगाव, महाडी, रामटेक-50, लोणावळा-180, वळवण-100, शिरोटा, शिरगाव, खोपोली, धारावी-70.