पुणे: कोकणातील रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात गुरुवार, ९ जुलै रोजी मुसळधार पाऊस पडेल. मात्र, मुंबईसह उर्वरित मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात पावसाचा जोर कमी झाला असून, मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे.
गुजरात, उत्तर केरळ, अरबी समुद्र भागात कमी दाबाचे क्षेत्र कायम असून त्या प्रभावाने गुरुवारी कोकणात फक्त रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात मुसळधार पाऊस पडणार आहे. मात्र, मुंबईसह उर्वरित, मध्यमहाराष्ट्र मराठवाडा, विदर्भात पावसाचा जोर कमी झाला असला तरीही या भागात मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
घाटमाथा भागात सर्वाधिक पाऊस: राज्यात गेल्या चोवीस तासांत घाटमाथा भागात जोरदार पाऊस झाला आहे. लोणावळा- १८०, अम्बोणे-१३०, वळवण १०० मिलिमीटर पाऊस पडला तर मध्य महाराष्ट्रात महाबळेश्वर १२०, इगतपुरी- ११०, वेल्हे-९० गगनबावडा, राधानगरी ८० मिमी प्रत्येकी पाऊस झाला.