# आता केवळ 135 रूपयांत मिळणार ऑनलाईन डिजिटल प्रॉपर्टी कार्ड

 

पुणे: भूमी अभिलेख विभागाच्यावतीने संकेतस्थळावरून नागरिकांना डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड (मिळकत पत्रिका) लवकरच मिळणार आहेत. त्यासाठीचे दर राज्य शासनाने निश्चित केले आहेत. त्यानुसार महापालिका हद्दीत 135, नगरपालिका, नगरपंचायत 90 तर ग्रामीण क्षेत्रासाठी 40 रूपये दर आकारण्यात आला आहे. त्यासाठीचा अध्यादेश जारी करण्यात आला आहे.

नागरिकांना शासकीय तसेच इतर कामांसाठी मिळकत पत्रिकेची (प्रॉपर्टी कार्ड) कायम गरज असते. मात्र, ते लवकर व वेळेत उपलब्ध होईलच याची कोणतीही शाश्वती नसते. ही बाब ओळखून शासनाने आता ऑनलाईन डिजिटल प्रॉपर्टी कार्ड नागरिकांना उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात सुमारे 57 लाखांहून अधिक प्रॉपर्टी कार्डधारक आहेत. पहिल्या टप्प्यात मुंबई आणि उपनगरातील नागरिकांसाठी डिजिटल स्वाक्षरी असलेले प्रॉपर्टी कार्ड मिळणार आहेत. यासाठी केंद्र शासनाच्या ‘ईझ ऑफ डुईंग बिजनेस’ व्यवस्थेवर राज्याचा गुणवत्तेचा क्रमांक निश्चित केला असून, ई-पीसीआयएस प्रकल्पातंर्गत डिजिटल कार्ड उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. राज्य शासनाने जारी केलेल्या अध्यादेशानुसार हे प्रॉपर्टी कार्ड नागरिकांना महाभूमी अभिलेखच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन काढावे लागणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *