औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात आज 168 जणांना (मनपा 122 , ग्रामीण 46) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 5229 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 350 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने (मनपा 295, ग्रामीण 55) जिल्ह्यातीत एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 8814 झाली आहे. आजपर्यंत एकूण 358 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3227 कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरू आहेत. सायंकाळनंतर 164 रुग्णांची वाढ झाली आहे. यामध्ये अँटीजेन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत 91 पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सिटी एंट्री पॉइंटवर 30 आणि मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास 61 रुग्ण आढळलेले आहेत.
दरम्यान, आज चार कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. घाटीत एन सहा सिडकोतील 49 वर्षीय पुरूष, छावणीतील 76 वर्षीय महिला, खासगी रुग्णालयात शिवशंकर कॉलनीतील 49 वर्षीय पुरूष, अन्य एका खासगी रुग्णालयात 45 वर्षीय स्त्री असलेल्या कोरोनाबाधित रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
सायंकाळनंतर आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे: (कंसात रुग्ण संख्या)- मनपा कहद्दीतील रुग्ण: (36 )- आर्यन नगर (1), कांचन नगर, नक्षत्रवाडी (1), पडेगाव (1), हनुमान नगर (1), एन सहा सिडको (2), गजानन नगर (1), साजापूर (1), जाधववाडी (1) सिडको (1), टीव्ही सेंटर (1), जामा मस्जिद परिसर (1), वीर सावरकर नगर (1), सुदर्शन नगर (1), नारेगाव (1), कबाडीपुरा (1), रेल्वे स्टेशन परिसर (1), सराफ रोड (1), मौलाना आझाद रोड (1), मयूर नगर, हडको (2), कॅनॉट (1), अन्य (3), पद्मपुरा (2), निराला बाजार (2), खाराकुँवा (4), सातारा परिसर (2), कृष्णा नगर (1).
ग्रामीण भागातील रूग्ण (37): अंभई, सिल्लोड (1), रांजणगाव (24), जीपीएस कॉलनी विटावा (2), बजाज नगर (4), म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोल पंपाजवळ (2), सुभानपूर (1), पैठण (1), बिलाल नगर, सिल्लोड (1), गोदावरी कॉलनी, गंगापूर (1) या भागातील कोरोनाबाधित आहेत.
सिटी एंट्रीपॉइंटवर रुग्ण (अँटीजन) (30): गोलवाडी (1), वाळूज रांजणगाव (1), पडेगाव (2), वाघोली पुणे (1), चनेगाव (1), साजापूर (1), वडगाव (1), वेरूळ (1), मिटमिटा (1), खुलताबाद (1), कुंभेफळ (2), आकाशवाणी (1), सिध्दार्थनगर (1), एन 9 (1), जटवाडा (1), जाधववाडी (1), एन अकरा (1), रांजणगाव (1), दत्तनगर (1), गेवराई (4), इटखेडा (1), नक्षत्रवाडी (4).