# पुणे जिल्ह्यात आज 1727 रूग्णांची वाढ; विभागात एकूण 49 हजार 187 कोरोनाबाधित.

पुणे: पुणे विभागातील 30 हजार 27 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 49 हजार 187 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 17 हजार 593आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 567 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 624 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.05 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.19 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

यापैकी पुणे जिल्ह्यातील 41 हजार 122 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 25 हजार 457 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 14 हजार 553 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 10 हजार 431, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 3 हजार 1 व पुणे कॅन्टोन्मेंट 79, खडकी विभागातील 46, ग्रामीण क्षेत्रातील 919, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 77 रुग्णांचा समावेश आहे. पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित एकूण 1 हजार रुग्णांचा 112मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 869, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 128 व पुणे कॅन्टोन्मेंट 27, खडकी विभागातील 18, ग्रामीण क्षेत्रातील 47, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 23 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 456 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.91 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.70 टक्के इतके आहे.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 50 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 727, सातारा जिल्ह्यात 91, सोलापूर जिल्ह्यात 137, सांगली जिल्ह्यात 32 तर कोल्हापूर जिल्ह्यात 63 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 1 हजार 843 रुग्ण असून 1 हजार 66 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 711 आहे. कोरोनाबाधित एकूण 66 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार 236 कोरोनाबाधित रुग्ण असून 2 हजार 307 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 587 आहे. कोरोनाबाधित एकूण 342 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 671 रुग्ण असून 338 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 314 आहे. कोरोनाबाधित एकूण 19 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 315 कोरोनाबाधित रुग्ण असून 859 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 428 आहे. कोरोनाबाधित एकूण 28 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *