# पुणे विभागात आज 2 हजारांवर रूग्णांची वाढ; आजपर्यंत एकूण 1हजार 612 रूग्णांचा मृत्यू.

पुणे:  पुणे विभागातील 31 हजार 390 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या 51 हजार 198 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 18 हजार 196 आहे. विभागात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 612 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 654 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.31 टक्के आहे, तर मृत्यूचे प्रमाण 3.15 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.

पुणे जिल्ह्यातील 42 हजार 846 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 26 हजार 623 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 15 हजार 78 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 145 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 424 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये ब-या होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.14 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.67 टक्के इतके आहे.

कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 11 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 724, सातारा जिल्ह्यात 106, सोलापूर जिल्ह्यात 69, सांगली जिल्ह्यात 27 तर कोल्हापूर जिल्ह्यात 85 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 1 हजार 949 रुग्ण असून 1 हजार 108 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 775 आहे. कोरोनाबाधित एकूण 66 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार 305 कोरोनाबाधित रुग्ण असून 2 हजार 422 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 535 आहे. कोरोनाबाधित एकूण 348 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 698 रुग्ण असून 372 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 305 आहे. कोरोनाबाधित एकूण 21 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 400 कोरोनाबाधित रुग्ण असून 865 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 503 आहे. कोरोनाबाधित एकूण 32 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *