# शिक्षण आपल्या दारी; बहुजन कल्याण संचालनालयाचा उपक्रम.

पुणे: महाराष्ट्रात बहुजन कल्याण विभागाच्या वतीने विमुक्त जाती व भटक्या जमाती ह्या समाज घटकांच्या विद्यार्थ्यांसाठी निवासी आश्रमशाळा चालविल्या जातात आजच्या कोरोनाच्या परिस्थितीत सर्व शाळा बंद आहेत. अशा परिस्थितीत मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी राज्यातील सहायक आयुक्त समाज कल्याण विभाग यांची ऑनलाईन आढावा व ऑनलाईन शिक्षण ह्या विषयावर शरद अहिरे संचालक व श्रीमती जयश्री सोनकवडे उपसंचालक बहुजन कल्याण संचालनालय यांनी गुरूवार, 16 जुलै रोजी ऑनलाईन बैठक घेतली.

या बैठकीत श्रीमती जयश्री सोनकवडे उपसंचालक यांच्या संकल्पनेतून शिक्षण आपल्या दारी हा उपक्रम राबविण्याचे आदेश सर्व सहायक आयुक्त समाज कल्याण यांना दिले आहेत.

ह्या उपक्रमात खालील बाबी राबविण्यात येणार आहेत:
1) विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण देणे.
2) ज्या विद्यार्थ्याकडे मोबाईल नाही व नेट ची सुविधा नाही अशा विद्यर्थ्यांसाठी शिक्षकांनी तांड्या वस्तीवर जाऊन शिक्षणाची सुविधा करणे.
3) सर्व शिक्षकांनी आपल्या विषयांचे व्हिडीओ तयार करणे.
4) पालकांमध्ये शिक्षणाचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती करणे.
5) कोरोना आजाराविषयी जनजागृती करणे.
6) मुलींच्या शिक्षणाचे महत्व पालकांना पटवून देऊन त्यांच्या हक्काची जाणीव पालकांना करून देणे.
7) शिकविलेल्या अभ्यासक्रमावर विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे
8) अध्यापन पद्धतीमध्ये कृती शिक्षणावर भर देणे.
9) विद्यार्थ्यांची गळती होणार नाही यासाठी उपक्रम राबविणे
10) शिक्षणाच्या गुणवत्तापूर्ण व शाश्वत विकासासाठी नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणे
11) मुलांना पुस्तके, वह्या, गणवेश, व शैक्षणिक साहित्य वितरण करणे.
अशा पद्धतीने विद्यार्थ्यांना ऑनलाईन किंवा उपलब्ध साधनाचा वापर करून शिक्षण देण्यासाठी उपाययोजना करत असताना समजतील दानशूर
व्यक्तीची मदत किंवा CSR च्या माध्यमातून निधी उपलब्ध करण्यासाठी सूचना देण्यात आल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *