पुणे: पुणे विभागातील 34 हजार 55 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 55 हजार 608 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण 19 हजार 846 आहेत. विभागात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 707 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच 672 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे विभागामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 61.24 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 3.07 टक्के इतके आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ.दीपक म्हैसेकर यांनी दिली.
यापैकी पुणे जिल्ह्यातील 46 हजार 276 बाधित रुग्ण असून कोरोनाबाधित 28 हजार 921 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 16 हजार 139 आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 11 हजार 543 , पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 3 हजार 136 व पुणे कॅन्टोन्मेंट 121, खडकी विभागातील 44, ग्रामीण क्षेत्रातील 1 हजार 218, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 77 रुग्णांचा समावेश आहे.
पुणे जिल्ह्यात कोरोनाबाधित एकूण 1 हजार 216 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पुणे महानगरपालिका क्षेत्रातील 921, पिंपरी चिंचवड महानगरपालिका क्षेत्रातील 167 व पुणे कॅन्टोन्मेंट 29, खडकी विभागातील 20, ग्रामीण क्षेत्रातील 54, जिल्हा शल्य चिकीत्सक यांच्याकडील 25 रुग्णांचा समावेश आहे. तसेच 463 रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत. पुणे जिल्ह्यामध्ये बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 62.50 टक्के आहे. तर मृत्यूचे प्रमाण 2.63 टक्के इतके आहे.
कालच्या बाधित रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधित रुग्णांच्या संख्येमध्ये एकूण 2 हजार 386 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 1 हजार 915, सातारा जिल्ह्यात 71, सोलापूर जिल्ह्यात 212, सांगली जिल्ह्यात 65 तर कोल्हापूर जिल्ह्यात 123 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.
सातारा जिल्ह्यातील कोरोनाबाधित 2 हजार 144 रुग्ण असून 1 हजार 179 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 894 आहे. कोरोनाबाधित एकूण 71 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सोलापूर जिल्ह्यातील 4 हजार 709 कोरोनाबाधित रुग्ण असून 2 हजार 601 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 753 आहे. कोरोनाबाधित एकूण 355 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाबाधित 841 रुग्ण असून 420 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 396 आहे. कोरोनाबाधित एकूण 25 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील 1 हजार 638 कोरोनाबाधित रुग्ण असून 934 बाधित रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 664 आहे. कोरोनाबाधित एकूण 40 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.