अनेक संस्था आणि उद्योग विविध रूपांनी काम करत असतात. एक शेतकऱ्याचा मुलगा होतो आणि मूळ व्यवसाय हा शेती होता. आई , वडील, आजी, आजोबा यांच्याकडून बालपणापासूनच शेतीचे बाळकडू मिळाले. महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे आणि पुणे शहराच्या अगदी जवळ असलेल्या खेडेगावात राहत असल्यामुळे शेतीचा गंध तर होताच परंतु विज्ञानाचा वापर करून नवीन काहीतरी करण्याची चिकाटी आणि जिज्ञासा होती. अशाच जिज्ञासेपोटी खूप विचार करून ग्रामीण भागातील शेतकरी यांच्यासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान याचा वापर करून काहीतरी नावीन्यपूर्वक करण्याचा निश्चय केला. याच विचारात असताना बियाणे कंपनीची संकल्पना सुचली. हा विचार फक्त विचार ठेवायचा नाही हे ठरवून आणि तो पूर्णत्वाला घेऊन जाण्याचा निश्चय करून आशिया खंडातील सध्याचे भाजीपाला बियाणे संशोधनात अग्रेसर असणाऱ्या कंपनी, उद्योग तसेच विविध देशातील शासकीय संस्था आणि विद्यापीठे इथे भेटी देऊन भाजीपाला पिकातील नवीन संशोधन आणि तंत्रज्ञान वापरून तयार केलेले बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा निर्धार केला. या कार्यास ३ वर्षांपूर्वी सुरुवात केली. एक मोठी सकाळ उजाडली आणि सॅमनॅक सीड्स या बियाणे कंपनीचा उदय झाला.
पहिल्या दिवसापासून एकाच निश्चयाने या कंपनीची मुहूर्तमेढ केली ती म्हणजे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना उच्च प्रतीचे आणि तंत्रज्ञानयुक्त बियाणे कमीत कमी किमतीत द्यायचे. एका बियाण्याची किंमत, त्या बियाण्यापासून तयार होणारे एक झाड आणि त्या झाडापासून मिळणारी फळे / भाज्या आणि त्याची आस लावून बसलेला शेतकरी याची मला पूर्ण जाणीव होती. माझा शेतकरी, माझा बळीराजा हा कधीच मागे पडला नाही पाहिजे म्हणून स्वतः शेतकरी असून सुद्धा माझ्या मुलासमान वैज्ञानिक मित्र आणि एक हाडाचा शास्त्रज्ञ यांच्यासोबत आशिया खंडातील देश ज्या देशांचे वातावरण भारताशी मिळते जुळते आहे अशा तैवान, थायलंड, चीन, इंडोनेशिया, मलेशिया इत्यादी देशात नवीन तंत्रज्ञान आणि बियाणे संशोधनातील प्रगती जाणून घेण्यासाठी फिरलो. या सर्व देशातील प्रगतशील आणि अतिउच्च तंत्रज्ञान वापरून तयार केलेले विविध संकरित वाण भारतात त्याच्या चाचण्या घेऊन सॅमनॅक सीड्सच्या मार्फत प्रसारित केले.
एक शेतकऱ्याचा मुलगा कमी शिकलेला एका नवीन क्षेत्रात पाऊल ठेवतो, मनात थोडी भीती होती. परंतु मला शेतकऱ्यांची गरज, विविध संशोधित संकरित वाण आणि त्या नवीन वाणाची विविध भागातील गरज याची सांगड घालता आली. हे सर्व वाण विविध भागातील शेतकऱ्यांसाठी चाचणी प्रक्षेत्र तयार करून पाहणीसाठी उपलब्ध करून दिले आणि सर्व शेतकऱ्यांना त्यांना समजणाऱ्या भाषेत माहिती देण्यासाठी मी स्वतः आणि माझे सहकारी शास्त्रज्ञ यांच्या सहकार्याने हे सर्व वाण शेतकऱ्यापर्यंत पोहोचवण्याचा कार्यक्रम सुरु केला.
आज माझ्या या शेतीरूप ज्ञानपीठातील बघितलेले सर्व वाण शेतकरी ह्या सर्व संकरित बियाण्याचा वापर करत आहेत आणि आज जवळ जवळ दोन वर्षानंतर हे संकरित वाण सॅमनॅक सीड्सच्या वतीने विविध नावाने भारतातील महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा आदी भागात प्रसारित केलेले आहेत. यात प्रामुख्याने संकरित भेंडी, टोमॅटो, मिरची, वांगे, कारले, दोडका, मधू मक्का (स्वीट कॉर्न), कांडा, इत्यादी बियाण्यांचा समावेश आहे. आतापर्यंत माझ्यासारख्या शेतकऱ्याच्या शेतात सुरु असणाऱ्या छोट्याश्या ज्ञानपीठामध्ये तयार केलेले हे बियाणे दीड लाखाहून अधिक शेतकऱयांनी अनुभवले आहे. मला एकच समाधान वाटते, तोटके शिक्षण असताना मी काही एकर शेतात शेतकऱ्यांसाठी सुरू केलेल्या या छोट्याश्या गुरुकुलामध्ये प्रसारित केलेले वाण हे भारतातील माझ्या विविध भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या आर्थिक वाढीसाठी मदत करतात, याचे सर्व श्रेय माझ्यासारखे शेतात काम करून त्यांच्यासाठी काहीतरी वेगळे द्यायला भाग पाडणाऱ्या माझ्याच बांधवाना जाते. सॅमनॅक सीड्स च्या स्वरूपात मला भाजीपाला पिकवणाऱ्या शेतकऱ्याच्या शेतीसाठीचे असे ज्ञानपीठ उभा करता आले याचे सर्व श्रेय फक्त तुम्हालाच. तुमच्याकडूनच प्रेरित होऊन तुमच्यासाठीच काम करतोय यासारखे सुख कोठेही नाही.
-रवींद्र स. कुंजीर
प्रगतशील शेतकरी तथा
संस्थापक अध्यक्ष आणि संचालक
सॅमनॅक सीड्स, पुणे.
संपर्क: ९८२२० ६७५१९