अंबाजोगाई: बालाघाटाच्या रांगेत वसलेल्या मराठवाड्यात लहान उंच डोंगरदऱ्या आहेत. त्यात अनेक ओढे, नाले व पुढे त्यांचे नद्यात रूपांतर होते व त्या मुख्यनदीला मिळून समुद्राला मिळतात. अंबाजोगाईतील मुकुंदराज, डोंगर तुकाई मंदिर परिसरातील धबधबे खळखळून वाहत असल्याने परिसरात नयनरम्य चित्र निर्माण झाले आहे.
अंबाजोगाई हे डोंगरदऱ्याच्या कडेला वसलेले शहर आहे, जे जयंवती नदीच्या तीरावर आहे व ती शहराच्या मधोमध वाहते. पुढे वाण नदी जवळच आहे तिला ही जयवंती नदी तिला मिळते. अनेक धबधबे अंबाजोगाईच्या डोंगरात आहे. त्यात मुख्य नागनाथ मंदिराच्या मागे, मुकुंदराज समाधी परिसरातील धबधबे व डोंगर तुकाई हे महत्वाचे व उंच धबधबे आहे. अत्यंत सुंदरदृश्य या परिसरात आहे. 30 वर्षे झाले या परिसरात मृगाचा पाऊस फार झाला नाही. पण या वर्षी मृगाचा दमदार पाऊस झाला आहे. नदी नाले भरले आहे. वाहते झाले आहेत. वाहत्या पाण्याचे मंजुळ आवाज आणि हिरवेगार डोंगर हे दृश्य विलोभनीय आहे.
डोंगर तुकाईचा हा धबधबा उंच व गोलाकार आकारातील डोंगरावरून वाहतो. त्याच्या अवतीभवती आणखी ४ छोटेमोठे धबधबे आहेत. हे ठिकाण मांडवा रोड, अंबाजोगाई पासून ४ किलोमीटर अंतरावर आहे. अवतीभवती वन खात्याने हजारो वृक्ष लावले आहेत. आणि या वर्षी पाऊस चांगला झाल्याने डोंगराने शालू पांघरला आहे. (सर्व छायाचित्रे: दगडू लोमटे)