# कोरोनाचा कहर: राज्यात एकाच दिवशी ९५१८ नवीन रुग्णांची भर, २५८ जणांचा मृत्यू.

मुंबई: राज्यात आज ३९०६ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५४.६२ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ६९ हजार ५६९ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९५१८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख २८ हजार ७३० रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १५ लाख ६४ हजार १२९ नमुन्यांपैकी ३ लाख १० हजार ४५५ नमुने पॉझिटिव्ह (१९.८५ टक्के) आले आहेत. राज्यात ७ लाख ५४ हजार ३७० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४५ हजार ८४६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.  राज्यात आज २५८ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.८२ टक्के एवढा आहे.

राज्यात नोंद झालेले २५८ मृत्यू हे मुंबई मनपा-६४, ठाणे-७, ठाणे मनपा-१२, नवी मुंबई मनपा-८, कल्याण-डोंबिवली मनपा-२२, उल्हासनगर मनपा-४, भिवंडी-निजामपूर मनपा-७, पालघर-१, वसई-विरार मनपा-११, रायगड-८, नाशिक-५, नाशिक मनपा-१०, अहमदनगर-१, अहमदनगर मनपा-१, धुळे मनपा-१, जळगाव-१०, जळगाव मनपा-१, नंदूरबार-१, पुणे-५, पुणे मनपा-२५, पिंपरी-चिंचवड मनपा-१५, सोलापूर-१, सोलापूर मनपा-१, सातारा-५, कोल्हापूर-१, सांगली-४, सांगली मिरज कुपवाड मनपा-२, रत्नागिरी-२, औरंगाबाद मनपा-५, जालना-१, परभणी मनपा-१, लातूर-२, लातूर मनपा-२, उस्मानाबाद-१, अकोला-२, यवतमाळ-१, वाशिम-१, नागपूर-१, नागपूर मनपा-६ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *