# मध्यमहाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज.

पुणे:  गेल्या 24 तासांत मराठवाडा व विदर्भात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण, गोवा, मराठवाडा व विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस झाला. 22 जुलै रोजी मध्यमहाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज पुणे येथील वेदशाळेने व्यक्त केला आहे.

गोव्यासह संपूर्ण राज्यात 23 जुलै रोजी तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच महाराष्ट्र गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 24 जुलै रोजी कोकण, गोवा मध्यमहाराष्ट्रात व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून महाराष्ट्र गोवा किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. 25 जुलै रोजी कोकण, गोव्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असून, महाराष्ट्र किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याचा अंदाज पुणे येथील हवामानशास्त्र विभागाने व्यक्त केला आहे.

गेल्या 24 तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (मिलिमीटरमध्ये) पुढीलप्रमाणे:-

मराठवाडा-  बीड 100, अंबड,  वडवणी 80 प्रत्येकी,  जाफराबाद 70, अंबाजोगाई, कळमनुरी 60 प्रत्येकी, माजलगाव 50, कंधार, उमरगा 40 प्रत्येकी, मानवत, मुखेड, नायगाव, पैठण, परभणी, शिरूर कासार, सोनपेठ, तुळजापूर 10 मिलिमीटर प्रत्येकी.

विदर्भ-  बल्लारपूर 90, लाखनी 60, चंद्रपूर, राजुरा 40 प्रत्येकी, आमगाव, बुलडाणा, देऊळगावराजा, गोंड पिंपरी, साकोली, तिवसा 30 प्रत्येकी, भंडारा, भिवापूर, चिखली, मोहाडी अर्जुनी, सिंदखेडराजा, तिरोरा, तुमसर 20 मिलिमीटर प्रत्येकी.

मध्यमहाराष्ट्र-  आटपाडी, चंदगड, मोहोळ 40 प्रत्येकी, दहीवडी, माण माढा, मंगळवेढा, सोलापूर 30 प्रत्येकी. बार्शी, बातकणंगले, इंदापूर, जाट, पाचोरा, पंढरपूर, पेठ 20 मिलिमीटर प्रत्येकी.

घाटमाथा-  कोयना (नवजा), ताम्हीणी 30 प्रत्येकी, भिरा 50, डुंगरवाडी, खोपोली 20 मिलिमीटर प्रत्येकी.  तसेच मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव अप्पर वैतरणा, भातसा या क्षेत्रात 30 मिलिमीटर तर मिड-वैतरणा, तानसा या क्षेत्रात 20 मिलिमीटर प्रत्येकी असा पाऊस झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *