# कोरोना काळातील ‘कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापनाचे’ मॉडेल विकसित.

मराठवाड्यातील डॉ.सुयोग अमृतराव व डॉ.हनुमंत पाटील यांचे संशोधन

औरंगाबाद:  कोरोना काळातील ‘कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापनाचे’ मॉडेल मराठवाड्यातील दोन्ही विद्यापीठातील प्राध्यापकांनी विकसित केले आहे. या मॉडेलला भारतीय पेटंटच्या जर्नलमध्ये प्रसिद्धी देऊन मान्यता देण्यात आली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ उपपरिसर उस्मानाबाद येथील व्यवस्थापनशास्त्र विभागाचे संचालक डॉ.सुयोग अरुणराव अमृतराव व स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ उपकेंद्र लातूर येथील व्यवस्थापन संकुलाचे डॉ.हनुमंत श्रीराम पाटील यांनी तयार केले आहे. हे मॉडेल कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. हे मॉडेल पेटेंटसाठी मुंबई येथील भारतीय पेटेंट कार्यालयात सादर केले होते. हे मॉडेल भारतीय पेटेंटच्या जर्नलमध्ये १७ जुलै रोजी प्रकाशित झाले आहे.

जगात चालू असणारी महामारी व त्याचा देशाच्या आर्थिक परिस्थितीवर होणारा परिणाम आपण सर्वजण जवळून पहात आहोत. ज्या कुटुंबांनी आर्थिक व्यवस्थापन केले होते त्यांना या मोठ्या संकटाचा सामना करताना आर्थिक आडचणी कमी येत आहेत. परंतु कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापन ज्यांनी केले नाही अशा परिवाराला किंवा व्यक्तींना परिस्थितीशी सामोरे जाताना अनेक आडचणी येत आहेत. हे मॉडेल कौटुंबिक आर्थिक व्यवस्थापनाच्या दृष्टीने महत्वाचे आहे. हे मॉडेल पेटेंटसाठी मुंबई येथील ‘सिस्टम अँड प्रोसेस फॉर फायनांन्सियल मेनेजमेंट विथ कस्टमर सेल्फ सर्विस नावाने हे मॉडेल प्रकाशित झाले आहे. हे मॉडेल विकसित करताना व्यवस्थापनशास्त्र विभाग, उपपरिसर उस्मानाबाद व व्यवस्थापनशास्त्र संकुल, उपकेंद्र लातूर यांची मोठी मदत झाली आहे. या उपलब्धीबद्दल दोन्ही प्राध्यापकांचे कुलगुरू डॉ. प्रमोद येवले, प्र कुलगुरु डॉ.प्रवीण वक्ते, कुलसचिव डॉ.जयश्री सूर्यवंशी, संचालक डॉ. डी.के. गायकवाड यांच्यासह सर्व सहकारी व अधिकारी यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *