# राज्यात आज २६७ जणांचा मृत्यू; ९ हजार ४३१ नवीन रूग्णांची वाढ.

मुंबई: राज्यात आज ६०४४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६.७४ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या २ लाख १३ हजार २३८ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९४३१ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४८ हजार ६०१ रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.

आज निदान झालेले ९४३१ नवीन रुग्ण आणि नोंद झालेले २६७ मृत्यू यांचा तपशील असा (कंसात आज नोंद झालेले मृत्यू): मुंबई मनपा-११०१ (५७), ठाणे- २१८ (१३), ठाणे मनपा-२९६ (१०), नवी मुंबई मनपा-४०६ (८), कल्याण डोंबिवली मनपा-३५८ (९), उल्हासनगर मनपा-७५ (५), भिवंडी निजामपूर मनपा-३८ (२), मीरा भाईंदर मनपा-८१४३ (१), पालघर-१०५, वसई-विरार मनपा-२२२ (६), रायगड-३०९ (१२), पनवेल मनपा-१८२ (७), नाशिक-१०४ (१), नाशिक मनपा-३१९ (४), मालेगाव मनपा-११, अहमदनगर-१४०, अहमदनगर मनपा-२७५, धुळे-४३ (१), धुळे मनपा-२१ (१), जळगाव-१३० (१३), जळगाव मनपा-२९ (२), नंदूरबार-७ (१), पुणे- ३७५ (१७), पुणे मनपा-१९२१ (२८), पिंपरी चिंचवड मनपा-९०० (१०), सोलापूर-१७४, सोलापूर मनपा-१६८ (८), सातारा-१२० (१२), कोल्हापूर-१११ (२), कोल्हापूर मनपा-४३ (१), सांगली-१६, सांगली मिरज कुपवाड मनपा-१४८ (३), सिंधुदुर्ग-७, रत्नागिरी-६२, औरंगाबाद-१०२ (१), औरंगाबाद मनपा-१६१ (८), जालना-४४ (१), हिंगोली-१ (१), परभणी-६ (१), परभणी मनपा-१०, लातूर-३७, लातूर मनपा-१५ (३), उस्मानाबाद-३७ (१), बीड-२६, नांदेड-२९, नांदेड मनपा-४१, अकोला-२४ (१), अकोला मनपा-२१ (१), अमरावती-१ (१), अमरावती मनपा-३६, यवतमाळ-९ (३), बुलढाणा-२५ (३), वाशिम-१६ (१), नागपूर-६८, नागपूर मनपा-११३ (२), वर्धा-१२ (१), भंडारा-२, गोंदिया-७, चंद्रपूर-१९, चंद्रपूर मनपा-५, गडचिरोली-३(इतर राज्य १).

आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १८ लाख ८६ हजार २९६ नमुन्यांपैकी ३ लाख ७५ हजार ७९९ नमुने पॉझिटिव्ह (१९.९२ टक्के) आले आहेत. राज्यात ९ लाख ८ हजार ४२० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार २७६ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २६७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.६३ टक्के एवढा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *