# बीड, परळी, गेवराई शहरसह केज, पाटोदा, गेवराई तालुक्यात विविध ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषित.

बीड: जिल्ह्यातील विविध ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे बीड शहरातील २, परळी शहरातील २, गेवराई शहरातील ३ तसेच केज १, पाटोदा १ आणि गेवराई तालुक्यातील १ ठिकाणी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३) नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी मच्छिंद्र सुकटे यांनी दिले आहेत.

याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करणे आवश्यक आहे .

बीड शहरातील शिवाजीनगर व पंचशील नगर, परळी शहरातील पद्मावती कॉलनी व पोलीस कॉलनी, गेवराई शहरातील बेदरे गल्ली, महेश नगर व न्यू हायस्कूल पूर्व बाजू शारदानगर, गेवराई तालुक्यातील मौजे सिंदखेड (भिल्लवस्ती), केज तालुक्यातील बनसारोळा आणि पाटोदा तालुक्यातील मौजे घाटेवाडी येथे या गावात व वरील संबंधित परिसरात कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहे, असे आदेशात नमूद केले आहे. तसेच सर्व संबंधित ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येवून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहेत.

बीड, शिरुर, पाटोदा तालुक्यात काही ठिकाणी कंटेन्मेंट झोन शिथील:

बीड शहरातील रानूमाता मंदीर शाहूनगर, अक्षय प्लाझा, शहेनशाह नगर व विद्या नगर पूर्व, शिरुर तालुक्यातील मौजे तागडगाव आणि पाटोदा तालुक्यातील पिंपळवंडी व अंमळनेर पोलीस ठाणेसह परिसर येथील प्रतिबंध शिथील करण्यात येत असून परिस्थिती पूर्ववत करण्यात आली आहे असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी यांनी दिले आहेत.

या ठिकाणी प्रतिबंधात्मक कार्यक्षेत्रामध्ये मागील १४ दिवसात एकही कोविड-१९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद, बीड यांनी कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *