नवी दिल्ली: अयोध्येत बुधवार, 5 ऑगस्ट रोजी दुपारी 12.30 वा. श्रीराम जन्मभूमी मंदिराचा शिलान्यास होणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.
या कार्यक्रमाआधी, हनुमानगढी येथे होणारी पूजा आणि दर्शन सोहळ्यालाही पंतप्रधान उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर ते रामजन्मभूमीस्थळी जातील, तिथे ते ‘भगवान श्री रामल्लला विराजमान’ इथे होणारी पूजा आणि दर्शनात सहभागी होतील. त्यानंतर ते पारिजातकाचं रोप लावतील आणि नंतर त्यांच्या हस्ते भूमीपूजन होईल. यावेळी पंतप्रधानांच्या हस्ते शिलान्यास होईल. तसेच ‘श्री राम जन्मभूमी मंदिरा’विषयीच्या विशेष टपाल तिकिटाचं प्रकाशन देखील पंतप्रधान करतील.