बीड: बीड जिल्ह्यात विविध ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे २७ ठिकाणी अनिश्चित कालावधीसाठी कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आला असून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली असल्याचे आदेश अप्पर जिल्हा दंडाधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी दिले आहेत.
याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करणे आवश्यक आहे. या परिसरामध्ये अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली असून फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१) ,(३) लागू करण्यात आले आहे.
कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण निघाल्यामुळे बीड शहरामधील संस्कार कॉलनी गया नगर, गोविंदन नगर धानोरा रोड, लेंडी रोड चंपावती नगर (जय महाराष्ट्र हॉटेलची मागची बाजू), भाग्यनगर (पारनेरकर मंदिराच्या मागे), पोस्टमन कॉलनी, बुद्ध विहारच्या बाजूला खासबाग (काळीया मस्जिद), शिवाजीनगर (केएसके कॉलेज जवळ) दिलीप नगर, इंडिया बँक कॉलनी, नेत्रधाम व विप्रनगर या ११ ठिकाणी.
परळी शहरातील तात्या देशमुख गल्ली वडार कॉलनी मिलिंद नगर प्रिया नगर व शिवनगर या ५ ठिकाणी. अंबाजोगाई शहरातील एकात्मता कॉलनी, मंगळवार पेठ व भागीरथी नगर या ३ भागात.
केज शहरांमधील समर्थ नगर, कोल्हे वस्ती, हनुमान गल्ली, पाटील गल्ली राम मंदिर परिसर, रोजा मोहल्ला व अहिल्यादेवी नगर या ६ भागात. आष्टी तालुक्यातील कडा हे संपूर्ण गाव व केज तालुक्यातील ससाने वस्ती सोनीजवळा हे गाव या ठिकाणी तसेच वरील संबंधित परिसरात कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आला आहे आणि अनिश्चित कालावधीसाठी पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे.