# बीड जिल्ह्यात ७ तालुक्यातील १४ गावांसह ६ शहरातील ४० ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषित

बीड: जिल्ह्यातील विविध ठिकाणी कोरोना विषाणू बाधित रुग्ण आढळून आल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना जिल्ह्यातील ७ तालुक्यातील १४ गावांसह व ६ शहरांमधील एकूण ४० ठिकाणी कंटेन्मेंट झोन घोषित करुन अनिश्चित कालावधीसाठी फौजदारी प्रक्रिया दंड संहिता १९७३ चे कलम १४४ (१)(३)नुसार पूर्णवेळ संचारबंदी लागू केली आहे, असे आदेश अप्पर जिल्हादंडाधिकारी प्रविणकुमार धरमकर यांनी दिले आहेत.

याबाबतचा अहवाल जिल्हा आरोग्य अधिकारी बीड यांनी दिला आहे. त्यामुळे जिल्ह्यात इतर ठिकाणी कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून प्रतिबंधात्मक व्यवस्था कार्यरत करण्यात आली आहे.

बीड तालुक्यातील तांदळवाडी भिल्ल. परळी तालुक्यातील दाऊतपूर, बेलंबा या २ गावात.

अंबाजोगाई तालुक्यातील बाबळगाव प्राथमिक आरोग्य केंद्र उजनी हा परिसर. आष्टी तालुक्यातील धानोरा, मुर्शदपूर व कोयाळ या ३ गावात,

गेवराई तालुक्यातील गोविंदवाडी, राहेरी (संपूर्ण गाव), वडगाव ढोक, मन्यारवाडी व पांढरवाडी (संपूर्ण गाव) या ५ गावात. शिरूर तालुक्यातील मातोरी अंतर्गत पाडळसिंगी मेन रोड (222 हायवे) हा परिसर, जाटवड अंतर्गत नागनाथ नगर या २ भागात.

बीड शहरातील गणेश नगर औटी मंगल कार्यालय, बलशाली शिक्षक कॉलनी, पिंगळे गल्ली, सावता माळी चौक निखिल रेसिडेन्सी, अंकुश नगर, कारंजा रोड, कुंभारवाडा रविवार पेठ, विप्र नगर, मित्र नगर जुने शिवाजी विद्यालय व मोमीनपुरा या १० भागात.

परळी शहरातील माऊली नगर, इंदीरा नगर व सावतामाळी नगर या ३ भागात.

अंबाजोगाई शहरातील गवळीपुरा, खतीब गल्ली, लखेरा गल्ली मंगळवार पेठ, रविवार पेठ, हनुमाननगर रोड मंगळवार पेठ व सदर बाजार या ६ भागात.

माजलगाव शहरातील पोलीस वसाहत भाटवडगाव.  धारूर शहरातील उदयनगर.

केज शहरातील वसंत विद्यालय परिसर, स्वामी विवेकानंद शाळा परिसर, शाहूनगर वकीलवाडी, धारूर रोड व गोपाळ वस्ती- कानडी रोड या ५ भागात.

या १४ गावात व शहरांमधील वरील संबंधित २६ परिसरात कंटेन्मेंट झोन घोषित करण्यात आले आहेत, असे आदेशात नमूद केले आहे. या सर्व संबंधित ठिकाणी अनिश्चित काळासाठी बंद करण्यात येवून पूर्णवेळ संचारबंदी लागू करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *