# देशभक्तीपर चित्रपटांचा ऑनलाईन महोत्सव 7 ऑगस्टपासून; चित्रपट पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.

नवी दिल्ली:  राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, एनएफडीसीने देशभक्तीपर  चित्रपटांचा पहिला ऑनलाईन चित्रपट महोत्सव,  आयोजित केला आहे. स्वातंत्र्यदिन उत्सव 2020 चा भाग असलेला हा महोत्सव, माहिती आणि प्रसारण मंत्रालयाअंतर्गत आयोजित करण्यात आला आहे. शुक्रवार, 7 ऑगस्ट पासून हा महोत्सव सुरु होईल. या महोत्सवात, भारतीय ऐतिहासिक चित्रपट, ज्यात देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात गाजवलेल्या शौर्य आणि बलिदानाचे चित्रण असेल, असे चित्रपट निवडण्यात आले आहेत. देशविदेशातील भारतीयांच्या मनात राष्ट्रप्रेमाची भावना जागृत करण्यासाठी हा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

समीक्षकांनी नावाजलेले, विविध भारतीय भाषांमधले चित्रपट,  जसे,  हिंदी, मराठी,  तेलुगू, तमिळ,  बंगाली, गुजराती आणि मल्याळम या महोत्सवादरम्यान दाखवले जाणार आहेत. राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ, राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय तसेच बालचित्रपट सोसायटीच्या संग्रहात असलेले चित्रपट या महोत्सवात दाखवले जाणार आहे

त्याशिवाय पहिल्यांदाच रिचर्ड अटेनबरो यांचा ‘गांधी’ हा नावाजलेला चित्रपट ऑनलाईन उपलब्ध होणार आहे. तसेच मूकबधिर प्रेक्षकांना सुद्धा या चित्रपटाचा आस्वाद घेता येणार आहे.  माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेबसाईटवर या चित्रपटाची लिंक असेल. तसेच पत्र सूचना कार्यालय आणि माय गोव्ह यांच्या सोशल मीडिया हँडलवर देखील या चित्रपटांची लिंक मिळू शकेल त्याशिवाय ही लिंक परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या संकेतस्थळावर आणि विविध भारतीय दूतावासांच्या संकेतस्थळांवरही उपलब्ध असेल.

सात तारखेपासून दररोज  www.cinemasofindia.com
या संकेतस्थळावरुन हे चित्रपट मोफत दाखवले जातील.  महोत्सवात दाखवल्या जाणाऱ्या चित्रपटांमध्ये गांधी, द लिजंड ऑफ भगतसिंग, टँगो चार्ली, खाकी, गांधी से महात्मा तक, पहला आदमी, छोटा शिपाई, रोजा (तमिळ) आदी भारतीय भाषांतील 43 चित्रपटांचा समावेश आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *