नांदेड: नांदेडचे भाजपचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांना कोरोनाची लागण झाल्याचे 3 ऑगस्ट रोजी निष्पन्न झाले होते. त्याच दिवशी त्यांना उपचारासाठी औरंगाबाद येथील एमजीएम रुग्णालयात भरती करण्यात आले असून त्यांची प्रकृती ठणठणीत असल्याची माहिती देण्यात आली.
खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे चिरंजीव तथा जिल्हा परिषद सदस्य प्रवीण चिखलीकर यांना गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर प्रवीण चिखलीकर यांच्यावर औरंगाबाद येथे उपचार सुरू होते. प्रवीण चिखलीकर कोरोनामुक्त झाल्याने त्यांना उद्या आठ ऑगस्ट रोजी सुट्टी दिली जाणार असून ते 9 ऑगस्ट रोजी नांदेड येथे परतणार आहेत. दरम्यान, कामानिमित्त खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर औरंगाबाद येथे गेले होते. 3 ऑगस्ट रोजी त्यांना कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर उपचारासाठी त्यांना औरंगाबादमधील एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. खा.प्रतापराव पाटील चिखलीकर यांची प्रकृती ठणठणीत असून कार्यकर्ते पदाधिकारी हितचिंतकांनी काळजी करू नये. मी लवकरच कोरोनामुक्त होऊन आपल्या सेवेत पुन्हा रुजू होईल, असा विश्वास खा.चिखलीकर यांनी व्यक्त केला.