# लोकाभिमुख प्रशासन राबविण्यात यशस्वी झालो: जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम.

पुणे: जिल्‍ह्याचा जिल्‍हाधिकारी म्‍हणून काम करतांना खूप आनंद झाला. अनेक आव्‍हानात्‍मक प्रसंग आले. पण त्‍यातून लोकाभिमुख प्रशासन राबविण्‍यात यशस्‍वी झालो, अशा शब्‍दांत जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी आपल्‍या भावना व्‍यक्‍त केल्‍या. जिल्‍ह्यातील सर्व अधिका-यांनी लोकाभिमुख प्रशासन राबविण्‍याचे आवाहनही त्‍यांनी केले.

श्री. राम यांची नुकतीच प्रधानमंत्री कार्यालयात उपसचिव म्हणून बदली झाली आहे, तत्‍पूर्वी आज त्‍यांनी जिल्‍हाधिकारी कार्यालयातील निवासी उपजिल्‍हाधिकारी कार्यालय, निवडणूक कार्यालय, पुनर्वसन कार्यालय, राजशिष्‍टाचार कार्यालय, भूसंपादन शाखा, गृह शाखा, आपत्‍ती व्‍यवस्‍थापन, करमणूक कर शाखा, राष्‍ट्रीय सूचना विज्ञान केंद्र अशा विविध शाखांना भेट देवून कर्मचारी, अधिका-यांना शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी निवासी उपजिल्‍हाधिकारी डॉ. जयश्री कटारे, उपजिल्‍हाधिकारी सुधीर जोशी, सुभाष भागडे, सुनील गाढे, भारत वाघमारे, श्रीमंत पाटोळे, आरती भोसले, शिंदे, उपजिल्‍हा निवडणूक अधिकारी मृणालिनी सावंत, खनिकर्म अधिकारी संजय बामणे, राणी ताटे, जिल्‍हा आपत्‍ती व्‍यवस्‍थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, श्रावण ताते, जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग, विनायक राऊत, सचिन तांबोळी, सचिन तारू, सुनंदा ठकार, रवी कोळगे, योगेश ब्रम्‍हे, रामभाऊ भंडारी, तेजस्‍वीनी पारखी आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम म्‍हणाले, जिल्‍हाधिकारी कार्यालयाची इमारत देखणी असून तिचे देखणेपण जपले गेले पाहिजे. येथे येणा-या प्रत्‍येक नागरिकाचे योग्‍य समाधान झाले पाहिजे, त्‍यांच्‍या तक्रारीची दखल घेतली पाहिजे, अशी अपेक्षा त्‍यांनी व्‍यक्‍त केली. आपल्‍या कार्यकाळात सहकार्य करणा-या सर्वांचेच आभार मानून त्‍यांनी शुभेच्‍छा दिल्‍या.

जिल्‍हा माहिती कार्यालयास भेट:

जिल्‍हाधिकारी नवल किशोर राम यांनी जिल्‍हा माहिती कार्यालयास भेट दिली. या कार्यालयाने जिल्‍हा प्रशासन आणि प्रसारमाध्‍यम यांच्‍यात दुवा म्‍हणून उत्‍तम काम केल्‍याची भावना त्‍यांनी व्‍यक्‍त केली. या कार्यालयाच्‍या प्रत्‍येक अधिकारी- कर्मचा-यास मी ओळखतो, असेही ते म्‍हणाले. लोकसभा आणि विधानसभा निवडणूक काळात माध्‍यम प्रमाणीकरण आणि संनियत्रण समितीचे (एमसीएमसी) तसेच मीडिया सेंटरचे कामही उल्‍लेखनीय झाल्‍याची आठवण त्‍यांनी सांगितली. यावेळी जिल्‍हा माहिती अधिकारी राजेंद्र सरग यांनी जिल्‍हाधिकारी राम यांचे पुष्‍पगुच्‍छ आणि पुस्‍तक भेट देवून स्‍वागत केले. यावेळी प्रदर्शन सहायक नीलिमा आहेरकर, संदिप राठोड, विलास कसबे, गीतांजली अवचट, ज्ञानेश्‍वर कोकणे, सुहास सत्‍वधर, स्‍वाती साळुंके, विशाल कार्लेकर, जितेंद्र खंडागळे, सुनील झुंजार, रावजी बांबळे, दिलीप कोकाटे, शोभा मोहिते, चंद्रकांत खंडागळे यांच्‍यासह इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *