# मध्यमहाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर,  मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज.

पुणे:  गेल्या २४ तासांतील कोकण गोवा व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. कोकण गोव्यात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्र व विदर्भात बऱ्याच ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडला. अम्बोणे येथे सर्वाधिक १६० मिमी, तर ताम्हीणी येथे ११० मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

दरम्यान, रविवार, ९ ऑगस्ट रोजी कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबरोबरच पुढील तीन दिवस म्हणजे १० ते १२ ऑगस्ट दरम्यान कोकण गोवा व विदर्भात तुरळक ठिकाणी जोरदार तर मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मुसळधार पाऊस पडण्याची अंदाज पुणे येथील हवामान विभागाने वर्तवला आहे.

 गेल्या २४ तासांत राज्यात नोंदवला गेलेला पाऊस (मिमीमध्ये):

कोकण आणि गोवा: मडगाव, सांगे १०० प्रत्येकी, दोडा मार्ग ८०, केपे ७०, लांजा ६०, भिरा, माथेरान, पेण, फोंडा, सावंतवाडी, वैभववाडी ५० प्रत्येकी, जव्हार, कल्याण, कर्जत, खालापूर, कुडाळ, म्हापसा, पनवेल, पेडणे, उल्हासनगर ४० प्रत्येकी, अंबरनाथ, कानकोन, चिपळूण, म्हसाळा, पणजी (गोवा), पोलादपूर, राजापूर, रोहा, संगमेश्वर देवरुख, सुधागड-पाली, वाडा ३० प्रत्येकी, अलिबाग, डहाणू, कणकवली, खेड, मंडणगड, मार्मगोवा. पालघर, रत्नागिरी उरण, विक्रमगड २० प्रत्येकी.

मध्य महाराष्ट्र: चांदगड ९०, गगनबावडा, राधानगरी ८० प्रत्येकी, वेल्हे ७०, लोणावळा (कृषी), महाबळेश्वर ६० प्रत्येकी. आजरा, इगतपुरी, पन्हाळा ५० प्रत्येकी. पाटण, पेठ, शाहुवाडी, शिराळा ३०

प्रत्येकी, भोर, गडहिंग्लज कागल, पौड मुळशी २० प्रत्येकी.

मराठवाडा: लोहा ४०, धर्मबाद, कंधार २० प्रत्येकी, भोकर, मुदखेड, नायगाव खैरगाव १० प्रत्येकी.

विदर्भ: तुमसर ६०, पारशिवनी, सडक-अर्जुनी, साकोली ५० प्रत्येकी, भामरागड, भंडारा, लाखनी, मोहाडी, रामटेक ४० प्रत्येकी, देवरी, कोरची, मौदा २० प्रत्येकी.

घाटमाथा: अम्बोणे १६०, शिरगाव १२०, कोयना (नवजा), ताम्हिणी ११० प्रत्येकी, दावडी ९०, कोयना (पोफळी), लोणावळा (टाटा), डोंगरवाडी ६० प्रत्येकी, लोणावळा (ऑफिस), वळवण ५० प्रत्येकी, खंद ४०, शिरोटा, ठाकूरवाडी, खोपोली ३० प्रत्येकी, वाणगाव, भिवपुरी २० प्रत्येकी.

मुंबईला पाणीपुरवठा करणारे तलाव परिसरात- अप्पर वैतरणा ५०, मध्य वैतरणा, भातसा ३० प्रत्येकी, वैतरणा, विहार २० प्रत्येकी, तुलसी, तानसा १० मिलिमीटर प्रत्येकी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *